बॉलिवूड स्टार्सच्या मुला-मुलींच्या हाऊस-क्लब पार्ट्या बंद, ड्रग्जप्रकरणी आर्यनच्या अटकेचा परिणाम

एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर, स्टार किड्सच्या या पार्ट्या बंद झाल्या आहेत. कारण अनेक स्टार्सच्या मुला-मुलींना अटक होण्याची किंवा नावावर शिंतोडे उडण्याची भीती सतावते आहे.

    मुंबई – बॉलिवूडच्या स्टार्सना पार्टी करताना प्रत्येकाने पाहिले असेलच, पण खूप कमी जणांना माहिती असेल की त्यांची मुलं-मुलीही खूप पार्ट्या करत असतात. छोट्या सेलिब्रिटींच्या या पार्ट्याही रात्री उशिरापर्यंत चालतात, आणि त्या पार्ट्यांची रंगतही स्टार्सच्या पार्ट्यांइतकीच असते. पण एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर, स्टार किड्सच्या या पार्ट्या बंद झाल्या आहेत. कारण अनेक स्टार्सच्या मुला-मुलींना अटक होण्याची किंवा नावावर शिंतोडे उडण्याची भीती सतावते आहे.

    स्टार किड्स पॉप्युलर

    स्टार्सची मुलं जितकी सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत, तितकीच माध्यमांचीही त्यांच्यावर नजर असते. ही मुलं-मुली रात्री उशिरापर्यंत कुणाच्या तरी घरात रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करत असतात. यात आर्यन खान, सुहाना खान, नव्या नवेली, आरव, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सुशी कपूर, जहान कपूर, निर्वान खान, असलम खान, अरहान खान, राईसा पांडे या आणि अनेक नावांचा समावेश आहे. यांची लोकप्रियता त्यांच्या पालकांपेक्षा कमी नाही.

    कुठे होतात या स्टार किड्सच्या पार्ट्या

    या पार्ट्या त्यांच्यापैकीच एकाच्या घरात किंवा कुठल्यातरी क्लबमध्ये होतात. अनन्या पांडेचे घर किंवा संज कपूर, जान्हवी कपूर, अरबाज खान, सोहेल खान यांच्या घरी या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. काही पार्ट्या या मन्नतवर झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. अमिताभची नात नव्या नवेलीपण या स्टार किड्सच्या ग्रुपमध्ये आहे.