हृतिक रोशनच्या शर्टलेस फोटोवर एक्स बायको सुझेन खान फिदा, तिच्या खास कमेंटने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष!

या फोटोवर अक्षरश: लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडला. यापैकी एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ही कमेंट होती हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान हिची.

  अभिनेता हृतिक रोशनच्या बॉडीवर बडे-बडे फिदा होतात. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या हृतिकने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून चाहतेच नाही तर सुजैनही फिदा झाली. हृतिकने त्याचा एक शर्टलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. गळ्यात स्कार्फ, डोक्यावर कॅप आणि डोळ्यांवर काळा गॉगल असा हा हृतिकाचा फोटो काहीच तासांत व्हायरल झाला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

  या फोटोवर अक्षरश: लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडला. यापैकी एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ही कमेंट होती हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान हिची. ‘तू २१ वर्षांचाच वाटतोय…,’ असे सुजैनने कमेंटमध्ये म्हटले आहे.  अनिल कपूर यांनी देखील हृतिकच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

  सुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन २०० मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपले रस्ते वेगळे केले. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिलं. हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर, गेल्या वर्षी हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसला होता. आता लवकरच तो ‘क्रिश4’ या चित्रपटात दिसणार आहे.