
दिनेश विजानच्या आगामी ‘हम दो हमारे दो’(Hum Do Hamare Do Teaser Release) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
‘स्त्री’ आणि ‘लुका छुपी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या दिनेश विजानच्या आगामी ‘हम दो हमारे दो’(Hum Do Hamare Do Teaser Release) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर (Hum Do Hamare Do Release Date)करण्यात आली आहे. या चित्रपटात राजकुमार राव(Rajkumar Rao), क्रिती सेनन(Kriti Sanon), परेश रावल, अपारशक्ती खुराना आणि रत्ना पाठक प्रमुख भूमिकेत आहेत.
नेहमीच विविधांगी व्यक्तिरेखा साकारत रसिकांचं लक्ष वेधून घेणारा राजकुमार पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाल्याचं नुकतंच त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरवरून जाणवतं. ‘अब हमारा हिरो क्या करेगा ?’ असं कॅप्शन असलेलं पोस्टर काल राजकुमार आणि क्रितीकडून काल सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं होतं. आज या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
View this post on Instagram
‘बरेली की बर्फी’ या चित्रपटानंतर राजकुमार-क्रिती ही जोडी पुन्हा जमली आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर राजकुमार आणि क्रितीचा वेगळा लूक बघायला मिळत आहे. क्रितीने डोळ्याला चष्मा लावला असून स्नीकर्स घातले आहेत. पिवळ्या रंगाचं टीशर्ट, डेनिम आणि कॅज्युअल शूज घातलेला राजकुमार कोणावर तरी वैतागलेला दिसतो तर क्रिती आश्चर्यचकीत चेहऱ्यानं समोर पाहात आहे.
#HeroKyaKarega @RajkummarRao pic.twitter.com/iYoT7xm6rF
— Kriti MIMI Sanon (@kritisanon) October 5, 2021
गुजराती निर्माता अभिषेक जैन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, निर्मिती दिनेज विजार यांनी केली आहे.‘हम दो हमारे दो’चा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.