‘पोस्ट डिलीट करणार नाही’; केतकी चितळेने कोर्टात मांडली बाजू

केतकीने कोर्टात आपली बाजु मांडताना काही युक्तीवाद केले आहेत. आपण ती पोस्ट डिलिट करणार नाही. असं सांगताना आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितलं आहे. तसेच आपण राजकीय व्यक्ती नसल्याचंही तिने म्हटलं आहे.

    अभिनेत्री केतकी चितळे सध्या तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे पोलिसांच्या ताब्यात आहे. केतकीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)  यांच्यावर एक पोस्ट करत टीका केली होती. पण आता केलेली टीका तिला चांगलीच भोवली आहे. तिला अटक करण्यात आली असून येत्या १८ मेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत याचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांनीही केतकीला खडेबोल सुनावले आहेत.

    दरम्यान केतकीने कोर्टात आपली बाजु मांडताना काही युक्तीवाद केले आहेत. आपण ती पोस्ट डिलिट करणार नाही. असं सांगताना आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितलं आहे. तसेच आपण राजकीय व्यक्ती नसल्याचंही तिने म्हटलं आहे.

    कोर्टात केतकीनं स्वत:चं बाजु मांडली. यावेळी ती म्हणाली, मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे. तिच्या या वक्तव्याचा सोशल मीडियातून अनेक नेटकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मी ही स्वखुशीनं ही पोस्ट केली असल्याचेही केतकीनं कोर्टात सांगितले.

    कोर्टानं केतकीला १८ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या त्या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील निषेध नोंदवला होता. विचारांचा मुकाबला हा विचारांनीच करायचा असं सांगत केतकीनं ज्याप्रकारे तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या चुकीचे आहे असे ठाकरे यांनी म्हटले होते.

    पोलीस कोठडीनंतरही केतकीच्या अडचणीत वाढ होणार का, तिला जामीन मिळणार की तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार हे १८ मेच्या सुनावणीत कळणार आहे.