ankita lokhande

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या वाढदिवसामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केल्यामुळे अंकिताला अनेकांनी ट्रोल केलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होताना दिसते. आता अंकिताने इन्स्टा लाइव्हमध्ये ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलय. त्यामुळे अंकिताची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने सकाळी ६.३० वाजता इन्स्टाग्रावर लाइव्ह केलं. त्यावेळी अंकिता ध्यानसाधनेबद्दल बोलत होती. “मी याआधी सकाळी ११ वाजता उठायची. मी जेव्हा मेडिटेशन करायच ठरवलं तेव्हा मी सकाळी ४.३० वाजता उठण्यास सुरूवात केली. खरंतर सुरूवातीला मेडिटेशन करताना मला एक मिनिटसुद्धा शांत बसणं कठीण जात होतं. आता मी तासनतास मेडिटेशन करू शकते. मेडिटेशन केल्याने खूप फायदा होतो आणि करोनासारख्या काळात जेव्हा अनेक घटना घडत होत्या तेव्हा मेडिटेशनचा फायदा मला खूप झाला. मी १ जानेवारी २०२०ला मेडिटेशन करायला सुरूवात केली आणि आता १ जानेवारी २०२१ ला मला १ वर्ष पूर्ण होणार आहे,”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

ट्रोलरा दिलं सडेतोड उत्तर

“माझ्याबद्दल जे बोललं जातं त्याचा माझ्यावर परिणाम होतो. आता मी ठीक आहे कारण मी एक सक्षम आणि खंबीर स्त्री आहे. जर तुम्हाला मी आवडत नाही तर मला फॉलो करू नका. तरी मला फॉलो करायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. राग, द्वेष पसरवू नका. सगळ्यांना आनंद आणि प्रेम द्या कारण हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.” असं अंकिता म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)