‘बिग बॉस मराठी’ फेम हिना पांचाळला अटक, तिच्यासह अनेक अभिनेत्री, नृत्यदिग्दर्शिकेला पोलिसांनी घेतलं ताब्यात!

शहरातील महामार्गालगत व निसर्ग व डोंगर भागात विविध खाजगी बंगले आणि रिसॉर्ट असून, यात अनेकदा रेव्ह पार्टी व मादक पदार्थाची तस्करी खुल्या आम सुरू असते. यातील खाजगी बंगला मालक स्थानिक पोलीस व प्रशासनाला अजिबात घाबरत नाही. यावरून हॉटेल व खाजगी बंगल्यात कोणाच्या आशिर्वादाने हे काम चालते हे मात्र गुलदस्त्यात आहे.

  मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यात दि. २७ रोजी पहाटे दाेन वाजेच्या दरम्यान रेव्ह पार्टी सुरू असल्याची गाेपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळाली. यावेळी पोलीसांनी मध्यरात्री स्काय ताज विला बंगल्यावर छापा मारला असता यात ड्रग्ज, हुक्का आदी मादक द्रव्यासह तरुण-तरुणींसह बिभत्स अवस्थेत सुमारे २२ जण आढळून आले. या रेव्ह पार्टीप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांत १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश अाहे. यातील चार महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व १ महिला बिग बॉसफेम हिना पांचाल अाहे. या घटनेत संंशयित पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरूण बाफणा, करीश्मा, चांदणी भटीजा, श्रुती शेट्टी, रूचीरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशीकी, यांच्यातील चार जणांचे नावे अद्याप पोलीसांना मिळाले नाही. या पोलीसी छाप्यात घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य आढळून आल्याने पोलीसांनी ही कारवाई केल्याचे समजते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by HEENNAA PANCHAAL (@theofficialheena)

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, या घटनेतील फिर्यादी विभा दिनेशभाई गोंडलीया,  याने पोलीसांना दिलेल्या फिर्यादी वरून ऑनलाइन कपडे विक्री व्यवसायाचा चार वर्षांपासून संशयित निरज ललीत शर्मा, सुराणा यांची ओळख असल्याने पियुष शहा याच्या वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी दि. २५ रोजी सकाळी फिर्यादिसह आरोपी आरव, रूचीरा नार्वेकर, आकीब खान हे इगतपुरी येथे मानस रिसॉर्ट लगत असलेल्या स्काय ताज व्हिला बंगला नं. ५ ते ८ येथे पार्टीसाठी थांबले. यात सुमारे २२ जण याठिकाणी रात्री १२ वाजेला पियुष याच्या वाढदिवसाचा केक कापला. दि. २६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारात रेव्ह पार्टीला सुरवात झाली. घटनेतील सर्व तरुण-तरुणी मद्यधुंद अवस्थेत नाचगाणी करीत हाेते. यातील काही हुक्का, चरस, गांजा आणि ड्रग्जचे डोस घेत नशेच्या पावडरसह मादक पदार्थाचे सेवन करीत असतांना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारात पोलीसांनी छापा टाकला. यावेळी मद्यधूंद संशयित व मुद्देमालासह सर्व आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेत सायंकाळी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by HEENNAA PANCHAAL (@theofficialheena)

  शहरातील महामार्गालगत व निसर्ग व डोंगर भागात विविध खाजगी बंगले आणि रिसॉर्ट असून, यात अनेकदा रेव्ह पार्टी व मादक पदार्थाची तस्करी खुल्या आम सुरू असते. यातील खाजगी बंगला मालक स्थानिक पोलीस व प्रशासनाला अजिबात घाबरत नाही. यावरून हॉटेल व खाजगी बंगल्यात कोणाच्या आशिर्वादाने हे काम चालते हे मात्र गुलदस्त्यात आहे. याप्रसंगी संशयित १० पुरूष व १२ महिलांपैकी अनेक सहकारी सापडण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. तर काहींनी रात्रीतूनच येथून पळ काढल्याचे समजते. या घटनेतील संशीयतांपैकी काही फिल्म अभिनेत्यांना पोलीसांच्या बातमीदाराने घटना स्थळावरुन पळवून लावल्याची इगतपुरी तालुक्यात चर्चा सुरू आहे.
  या घटनेत नायजेरीयन विदेशी पुरूषाला गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून नशेली पदार्थ कोकीन, डोपींग, हैरोइन यांसह विदेशी नशा पावडर मिळून आल्याने मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त हाेत अाहे. मराठी बिग बॉसमधील नाियका हिना पांचाल तसेच हिंदी व पाश्यमात्य नृत्य दिग्दर्शीका व कलाकारांचा या घटनेत समावेश असल्याने पुन्हा एकदा सिनेसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by HEENNAA PANCHAAL (@theofficialheena)

  यावेळी कारवाई करताना ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर ग्रामीण पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले, गुन्हे पोलीस शाखेचे ए. एस. आय. नवनाथ गुरुळे, पोलीस हवालदार बी. बी. ठाकरे, पोलीस नाईक जगताप, संदीप हांडगे, सचिन पिंगळ, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. दिवटे, शिवाजी लोहरे, वैभव वाणी, मुकेश महिरे, राज चौधरी, होमगार्ड तालुका समादेशक शरीफ शेख आदीनी या कारवाईत भाग घेतला.