‘या’ सिनेमात अभिनेत्रीने दिला Nude Scene आणि झाला असा राडा की…

सीमा बिस्वास यांनी चित्रपटाच्या पडद्यावर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या पण आजही त्यांना 'बँडिट क्वीन' म्हणून ओळखले जाते.

  मनोरंजन विश्वात असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यांनी लोकांच्या हृदयावर वेगळी छाप सोडली आहे. यापैकी एक चित्रपट होता ‘बँडिट क्वीन’, ज्यामध्ये फुलन देवीची खरी कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील प्रत्येक पात्राला खूप प्रशंसा मिळाली पण फुलन देवी बनलेल्या सीमा बिस्वासने रातोरात आपलं नाव कमावलं.

  न्यूड सीनने लाइमलाइट लुटला

  सीमा बिस्वास यांनी चित्रपटाच्या पडद्यावर अनेक व्यक्तिरेखा साकारल्या पण आजही त्यांना ‘बँडिट क्वीन’ म्हणून ओळखले जाते. या चित्रपटाची खूप चर्चा झाली आणि त्यामागचे कारण होते चित्रपटात चित्रित केलेला एक बलात्कार दृश्य. या सीननंतर तिला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. चंबळची राणी फूलन देवीची भूमिका साकारण्यासाठी सीमाने खूप मेहनत घेतली. तिने फुलन देवीसारखे तिचे आयुष्य घडवले होते. पण एका न्यूड सीनने या चित्रपटाची सगळी लाइमलाइट लुटली.

  When Seema Biswas Felt Huge Pride Hearing Her Father's Reaction To Her Bold Scenes In 'Bandit

  सीमाने ‘बँडिट क्वीन’ चित्रपटात एक न्यूड सीन केला होता, ज्यावरून बराच वाद झाला होता. या सीनमध्ये अभिनेत्रीला न्यूड होऊन संपूर्ण गावात फिरावे लागले. सीमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटातील एका न्यूड सीनमुळे तिला रात्रभर रडावे लागले. हा सीन तिने स्वत: केला नसून बॉडी डबलने केला असल्याचे सीमाने सांगितले होते. असे असतानाही त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली, मात्र तिच्या कुटुंबीयांना ही गोष्ट माहीत असल्याने कोणालाच स्पष्टीकरण दिले गेले नाही.

  चित्रपटावर बंदी घालण्यात आली

  ‘बँडिट क्वीन’ चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, पतीच्या निधनानंतर फुलन देवीबद्दल लोकांचा गैरसमज होतो. बलात्कारासारख्या वेदनादायक घटनांना सामोरे गेल्यावर तीच फुलन देवी डकैत बनली. या चित्रपटातील अनेक वादग्रस्त दृश्यांमुळे चित्रपटगृहात बंदी घालण्यात आली होती. पण असे असतानाही हा चित्रपट लीक झाला आणि लोकांनी हा चित्रपट पाहिला.