sonu sood

आयकर विभागाने सोनू सूदच्या व्यवहाराविषयी अधिकृत वक्तव्य(Official Statement By Income Tax Department About Sonu Sood) दिले आहे.

    आयकर विभागाच्या(Income Tax Deprtment) सोनू सूदच्या व्यवहारामध्ये(Sonu Sood) मोठ्या प्रमाणात फेरफार सापडला आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे. आज आयकर विभागाने सोनू सूदच्या व्यवहाराविषयी अधिकृत वक्तव्य(Official Statement By Income Tax Department About Sonu Sood) दिले आहे.

    सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागाने तीन दिवस कारवाई केली होती.आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.

    अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने छापे घातल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, त्याच्याविरोधात २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीची माहिती मिळाली आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या इतर परिसरात शोध घेताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. सीबीडीटीने म्हटले आहे की, अभिनेत्याने बोगस आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरूपात बेहिशेबी पैसे जमा केले आहेत.

    प्राप्तिकर विभागाने सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा याची मोडस ऑपरेंडी स्पष्ट केली आहे. सोनू सूद हा बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कर्ज घेतल्याचे दाखवून बेहिशेबी पैसे आपल्या बँक खात्यात वळते करायचा. आयकर विभागाने सोनू सूदच्या घरी आणि संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये यासंबंधीची कागदपत्रे मिळाली आहेत. यावरुन सोनू सूदने तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर बुडवेगिरी केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

    आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. आयकर विभागाने अभिनेत्याशी संबंधित सहा ठिकाणी सर्वेक्षण केले होते. आयकर विभागाच्या अधिकृत वक्तव्यानंतर सोनू सूदच्या अडचणी वाढणार हे स्पष्ट होत आहे.