भारताचा ऑस्करमध्ये डंका! ‘बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ला ऑस्कर, तर ‘नाटू नाटू’ गाणयाला ऑस्कर पुरस्कार; वाचा विजेत्यांची यादी…

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या गाण्याला अंतिम नामांकन मिळाली होती, मात्र आता यातील दोन नामांकनासाठी आँस्कर पुरस्कार मिळाल आहे. तर यावेळी दीपिका पदुकोण प्रेझेंटर आहे. RRR चित्रपटाच्या संपूर्ण टीम तसेच दीपिक पदुकोण हे या सोहळ्याचे आकर्षक ठरताहेत.

लॉस एंजेलिस– भारतासाठी एक आनंदाची व अभिमानाची बातमी समोर येत आहे. भारताने आँस्करमध्ये आपले नाव कोरले आहे. जगभरातील चित्रपटसृष्टीसाठी मानाचा गौरव सोहळा म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळा. (Oscar Award 2023) या सोहळ्यात सहभागी होता यावे, किंवा यात पुरस्कारासाठी एक नामांकन मिळावे, किंवा पुरस्कार मिळावा हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिस (Los Angeles) इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत असलेल्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला सुरुवात झाली आहे. भारतातून (India) ऑस्कर अवॉर्डसाठी तीन नामांकन मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला, डॉक्युमेंटरी फीचर चित्रपट श्रेणीतील चित्रपट ऑल दॅट ब्रीद्स आणि मूळ लघुपट श्रेणीतील ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या गाण्याला अंतिम नामांकन मिळाली होती, मात्र आता यातील दोन नामांकनासाठी आँस्कर पुरस्कार मिळाल आहे. तर यावेळी दीपिका पदुकोण प्रेझेंटर आहे. RRR चित्रपटाच्या संपूर्ण टीम तसेच दीपिक पदुकोण हे या सोहळ्याचे आकर्षक ठरताहेत.

‘नाटू नाटू’ व ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने शॉर्ट फिल्मला ऑस्कर

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून सोमवारी सकाळीच एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय चित्रपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला आहे. तर ‘नाटू नाटू’ या गाण्याला सुद्धा आँस्कर पुरस्कार मिळाला आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास आहे. कारण ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. यंदा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुरस्कार विजेत्यांची यादी…

बेस्ट साऊंड – टॉप गन: मेव्हरिक

बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग

बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट

भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास