भारताच्या सर्वात मोठ्या सुपरस्टारने स्विगीच्या पुण्यातील डिलिव्हरी पार्टनरला डिलिव्हर केली बिर्याणी

शो दरम्यान झालेल्या गप्पांमध्ये आकाशने आपल्या घरी खाद्यपदार्थ डिलिव्हर होण्याचं आणि डिलिव्हरी करणाऱ्याला स्वतः टिप देण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं होतं. त्याची इच्छा पूर्ण करण्याचं औदार्य दाखवत अमिताभ बच्चन यांनी त्याला त्याचा आवडीचा पदार्थ- बिर्याणी, स्वहस्ते डिलिव्हर केली.

  • आपल्या घरी खाद्यपदार्थ डिलिव्हर होण्याचं डिलिव्हरी पार्टनरचं स्वप्न झालं पूर्ण

मुंबई : आकाश वाघमारे, या स्विगीच्या (Swiggy) पुण्यातील डिलिव्हरी पार्टनरने (Delivery partner in Pune) भारतातील सर्वात मोठे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ (Kaun Banega Crorepati 13) या लोकप्रिय शोमध्ये नुकताच भाग घेतला होता.

स्विगीच्या सहकार्याने आकाश (Akash) स्पर्धा परीक्षांची तयारी (Preparation for competition exams) करत असून पोलिस उप-निरीक्षक (PSI) होण्याचे त्याचे स्वप्न आहे. शो दरम्यान त्याने १२ व्या प्रश्नापर्यंत सर्व उत्तरे बरोबर देत १२.५ लाख रुपयांची रक्कम जिंकली. मात्र, त्यानंतरच्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे दिल्यामुळे त्याने जिंकलेली रक्कम ३.२ लाख रुपयांपर्यंत कमी झाली.

शो दरम्यान झालेल्या गप्पांमध्ये आकाशने आपल्या घरी खाद्यपदार्थ डिलिव्हर होण्याचं आणि डिलिव्हरी करणाऱ्याला स्वतः टिप देण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं होतं. त्याची इच्छा पूर्ण करण्याचं औदार्य दाखवत अमिताभ बच्चन यांनी त्याला त्याचा आवडीचा पदार्थ- बिर्याणी, स्वहस्ते डिलिव्हर केली. गमतीचा भाग म्हणजे, या सुपरस्टारने स्वतःला ‘डिलीव्हरी पर्सन’ असे संबोधत स्विगीच्या या डिलीव्हरी पार्टनरच्या घरी जेवण पोहोचवले.

आकाश वाघमारेसाठी डिलीव्हरी पर्सन बनतानाचा अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने या लिंकवर शेयर केला आहे – Instagram.