fighter

‘फायटर’ (Fighter Movie) हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट (India's First Aerial Action Movie)असून, या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

    भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) औचित्य साधून, व्हायकॉम 18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्सद्वारे निर्मित आगामी अ‍ॅक्शन पॅक चित्रपट ‘फायटर’ २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण भारतीय वायुसेनेच्या पराक्रमी पायलट्सची भूमिका साकारणार आहेत. तसेच अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

    भारतातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे ‘फायटर’च्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. या चित्रपटाला भव्य व आकर्षक बनवण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली असून, प्रेक्षकांना सेल्युलॉइडवर कधीही न पाहिलेला अनुभव देण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे एक सुवर्णयोग आहे.

    ‘फायटर’ हा भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट असून, या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. निर्माता आणि व्हायकॉम18 स्टुडिओचे सीओओ अजित अंधारे यांचा भारतीय मूळ असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अ‍ॅक्शन चित्रपट निर्माण करून जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जगभरात अनेक ठिकाणी झालं असून, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रे आणि तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करण्यात आला आहे.