sushmita nawazuddin and vir das

‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२१’कडून(International Emmy Awards 2021) भारताला खूप अपेक्षा होत्या. मात्र यावेळी भारताच्या पदरी निराशाच पडली आहे.

    मुंबई : न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२१’कडून(International Emmy Awards 2021) भारताला खूप अपेक्षा होत्या. यावेळी वीर दास, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सुष्मिता सेन अभिनित ‘आर्या’ला भारताकडून नामांकन मिळाले होते. मात्र यावेळी भारताच्या पदरी निराशाच पडली आहे.

    अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, वीर दास आणि सुष्मिता सेन यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते.आंतरराष्‍ट्रीय एमी अवॉर्ड्समध्‍ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ‘सिरीयस मॅन’मधील अभिनयासाठी सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, स्कॉटिश अभिनेता डेव्हिड टेनंट याने या श्रेणीत ट्रॉफी आपल्या नावावर केली. दुसरीकडे, वीर दासचा शो बेस्ट कॉमेडी कॅटेगरीत मागे पडला आहे. वीरला मात देत, हा पुरस्कार ‘कॉल माय एजंट’ या हिट फ्रेंच शोला मिळाला आहे.सुष्मिता सेनच्या ‘आर्या’ला सर्वोत्कृष्ट नाटक विभागात नामांकन मिळाले होते.‘आर्या’ला इस्रायली प्रोडक्शन तेहरानने पराभूत केले.

    गेल्या काही वर्षांत भारतीय शो आणि कलाकारांना आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये ओळख मिळाली आहे. गेल्या वर्षी ‘दिल्ली क्राइम’ला सर्वोत्कृष्ट ड्रामाचा पुरस्कार मिळाला. ‘मेड इन हेवन’ या शोसाठी अभिनेता अर्जुन माथूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.