शोले स्टाईलमध्ये इराणी महिलेचा डान्स, नवरा झाला विरू, आणि…. हा VIDEO सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ!

इराणच्या एका महिलेने शोले चित्रपटातील गाण्यावर केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे. ‘शोले’तील ‘जब तक है जान…’ या गाण्यावर ही इराणी महिला शोलेतील बसंतीप्रमाणे आपली नाचताना दिसतेय. हा व्हिडिओ बघताना शोले चित्रपट बघितल्याचा भास तुम्हाला होईल.

    हिंदी चित्रपट सृष्टीतील आयकॉनिक फिल्म म्हणजे शोले. या चित्रपटाची क्रेझ आजही कमी झालेली नाही. ही क्रेज फक्त भारतीय प्रेक्षकवर्गातच नाही परदेशी प्रेक्षकांमध्येही दिसून येते. ‘शोले’ला इतकी वर्षे झाली पण आजही या चित्रपटातील गाणे, डायलॉग कॉपी करुन लोक त्याचे व्हिडीओ बनवत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय.

    काय आहे व्हिडिओत

    इराणच्या एका महिलेने शोले चित्रपटातील गाण्यावर केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे. ‘शोले’तील ‘जब तक है जान…’ या गाण्यावर ही इराणी महिला शोलेतील बसंतीप्रमाणे आपली नाचताना दिसतेय. हा व्हिडिओ बघताना शोले चित्रपट बघितल्याचा भास तुम्हाला होईल.

    या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्ण सीन शोले चित्रपटाप्रमाणे तयार केला आहे. हा व्हिडीओ इनडोअर शूट केला असला तरी चित्रपटातील वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. चित्रपटातील कॅरेक्टरही उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडताना दिसतोय.