parineeti chopra and raghav chadhdha

खरंच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकमेकांना डेट करत आहेत का? की या सर्व गोष्टी निव्वळ अफवा आहेत, याबद्दल माहिती समोर आली आहे.

आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral Video) झाला आहेय या व्हिडिओमध्ये एका रेस्टॉरंटमधून ते दोघं एकत्र बाहेर येताना दिसत आहेत. मुंबईतल्या एका रेस्टॉरंटबाहेरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

या व्हिडिओमुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे की, खरंच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकमेकांना डेट करत आहेत का? की या सर्व गोष्टी निव्वळ अफवा आहेत, याबद्दल माहिती समोर आली आहे. खरं तर दोघांच्याही डेटिंग व रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. मिळालेल्या माहितीनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे फक्त चांगले मित्र आहेत. ते एकमेकांना डेट करत नाहीत. मात्र, परिणीती आणि राघव या दोघांनी अधिकृतरित्या याबद्दल काहीही सांगितलेलं नाही.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधली मैत्री
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा सलग दोन दिवस एकत्र दिसले, त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. पण, ते दोघेही चांगले मित्र आहेत. ते दोघे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकले आहेत. त्यामुळे त्यांचे बरेच कॉमन मित्र आहेत. तसेच राघव चढ्ढा ट्विटरवर फक्त 44 जणांचा फॉलो करतात, त्यापैकी फक्त दोन जण बॉलिवूडमधील कलाकार आहेत. त्यापैकी एक गुल पनाग आहे, जी आम आदमी पार्टीची सदस्य आहे, तर दुसरी आहे परिणीती चोप्रा. एकंदरीतच त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये कोणतीही तथ्ये सध्या दिसत नाहीयेत. ते फक्त मित्र आहेत. ते सहज एकमेकांना भेटायला आले होते.