तो दिवस असणार खास, कारण ‘त्या’ दिवशी सैफिना जाहीर करणार छोट्या नवाबाचं नाव!

करीना तिच्या बाळाचं नाव आणि तीन महिन्याचं तिचं बाळ झाल्याचा उत्सव लंडनमध्ये जाऊन करणार आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांसमोर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून करीनाला लंडनची प्रचंड आठवण येतं आहे असे तिने अनेक वेळा सांगितलं आहे.

    करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली. तिच्या मुलाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र,  करीनाने तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. अद्याप तीने दुसऱ्या बाळाचे नाव जाहीर केलेलं नाही. तैमूरवर ज्या प्रमाणे सोशल मीडियावर चर्चा होत असतात. तशा चर्चांपासून त्यांना त्यांच्या दुसऱ्या बाळाला लांब ठेवायचं आहे.

    करीना देखील तिच्या मुलाच नाव लवकरच सांगेल आणि सोबतच त्याचा फोटोदेखील शेअर करेल अशी आशा तिच्या चाहत्यांना लागली आहे. तिचे चाहते २१ एप्रिलच्या प्रतिक्षेत आहे कारण त्या दिवशी तिचा दुसरा मुलगा आणि तैमूरचा धाकटा भाऊ हा ३ महिन्याचा होणार आहे.