आलिया पाठोपाठ ईशा अंबानीची मेट गालामध्ये धमाकेदार एन्ट्री, साडी गाऊनमध्ये खुललं इशाचं सौंदर्य, ड्रेससाठी तब्बल लागले 10,000 तास!

ईशा अंबानीने मेटगालामध्ये आपल्या उपस्थितीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी तीने राहुल मिश्राने डिझाइन केलेली साडी नेसली होती.

    जगातील सर्वात मोठा मेगा फॅशन इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट गालाला (MET Gala 2024) 6 मेपासून सुरूवात  झाली आहे. न्यूयार्कमधील मेट्रोपॅालिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये  या इव्हेंटच भव्य उद्घाटन झालं. या शोमध्ये जगभरतील अनेक स्टार्स उपस्थिती लावत आहेत. भारताकडून आलिया व्यतिरिक्त देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीची मुलगी ईशा अंबानीही या शोमध्ये सहभागी झाली आहे. आलियाच्या देसी लूकनं सगळ्यांना भुरळ पाडली आहेच आता या शोमधून ईशा अंबानीचाही लूक (Isha Ambani Look In MET Gala) समोर आला आहे. साधेपणासोबत ट्रेंडी लूक करत ईशा लाईमलाईटमध्ये आली आहे.

    साडी गाऊनमध्ये ईशाची ग्रॅन्ड एन्ट्री

    मेट गालाला उपस्थित राहणे ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट असते. जगभरातील अनेक प्रतिष्ठित लोकांना या फॅशन इव्हेंटचा भाग व्हायचे आहे, परंतु ज्यांना मेट गालाने आमंत्रित केले आहे तेच या शोमध्ये सहभागी होऊ शकतात. या भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ईशाही न्यूयॉर्कला पोहोचली आहे. मेट गालाच्या कार्पेटवर ईशानं साडीच्या गाऊनमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. भारतीय डिझायनर राहुल मिश्राने डिझाईन केलेल्या साडीत ईशा खुपच सुदंर दिसत आहे.

    साडी बनवण्यासाठी लागले सुमारे 10,000 तास

    ईशानं घातलेल्या या साडी गाऊनला अनिता श्रॅाफ आणि राहुल मिश्रा यांनी डिझाईन केलं आहे. या वर्षीच्या मेट गालाची थीम ‘द गार्डन ऑफ टाईम’ ही आहे. या थीमनुसार, त्यांनी हाताने नक्षीकाम करत ही साडी तयार तयार केली आहे. या ड्रेसमध्ये निसर्गाच्या वैभवशाली आणि विपुल जीवनचक्राचं चित्रण केलं आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार या साडीला तयार करण्यासाठी कारगिरांना 10,000 तास लागले.