प्रतिक्षा एकदाची संपली! अहान आणि इश्की होणार विवाहबद्ध!

लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत आता एक सुखद वळण येणार आहे. त्या दोघांच्या आयुष्यात अनेक वळणे आणि नाट्य घडून गेल्यानंतर आता ते सुखी सहजीवनासाठी सिद्ध झाले आहेत.

    लग्नसराई सुरू झाली आहे! सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इश्क पर जोर नहीं या लोकप्रिय मालिकेत अहान आणि इश्की हे दोन प्रेमी जीव अखेरीस आता एकत्र येणार आहेत. अनेक चढउतारांनंतर त्यांच्या प्रेमाची परिणती आता विवाहात होणार आहे. मालिकेचे कथानक, त्यातील व्यक्तिरेखा आणि विशेषतः परम आणि अक्षिता यांची पडद्यावरची केमिस्ट्री यामुळे लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत आता एक सुखद वळण येणार आहे. त्या दोघांच्या आयुष्यात अनेक वळणे आणि नाट्य घडून गेल्यानंतर आता ते सुखी सहजीवनासाठी सिद्ध झाले आहेत.

     मालिकेत अहानची भूमिका करणारा परम सिंह #Ishqaan या लोकांच्या लाडक्या जोडीच्या लग्नाबबात स्वतःही तितकाच उत्साहात आहे. तो म्हणतो, “या मालिकेला आणि आमच्या व्यक्तिरेखांना मिळत असलेले प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. हा खूप सुंदर प्रवास होता. अहान आणि इश्की यांची प्रेमकहाणी पुढच्या टप्प्यावर जावी यास चाहत्यांचे मनापासून समर्थन आहे. इश्कान चाहत्यांसाठी ही अत्यंत सुखद बातमी आहे की, अहान आणि इश्की आता विवाहबद्ध होणार आहेत. ही दृश्ये शूट करताना आम्हाला खूपच मजा आली. त्यांचा विवाह ही या मालिकेतील एक ठळक घटना आहे. पण त्यांचा प्रवास इथेच थांबणार नाही.. प्रेक्षकांसाठी अजून त्यात बरेच मनोरंजन आणि नाट्य आहे.”

     इश्कीची भूमिका करणारी अक्षिता मुद्गल म्हणते, “अहान आणि इश्कीचे लग्न व्हावे अशी इच्छा असणार्‍या इश्कान फॅन्ससाठी हा प्रतिक्षेचा काळ खूप मोठा होता. पण आता ते घडणार आहे. लग्नाचा सोहळा आणि विधी यांचे शूटिंग करताना आम्हाला खूप मजा आली आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही ते पाहायला आवडेल. आता यापुढे कथानक आणखीन आकर्षक होऊन मनाची पकड घेईल.”