इश्कबाज फेम चुलबुली अभिनेत्री सुरभी चंदना अडकली विवाह बंधनात, प्रियकर करण शर्मासोबत जयपूरमध्ये बांधली लग्नगाठ!

    सध्या मनोरंजन सृष्टीत लग्नाचा सिझन सुरू आहे. मोठ्या पडद्यासोबत छोट्या पडद्यावरील कलाकारही लग्न उरकताना दिसत आहे. आता टेलिव्हिजन वरील लोकप्रिय आणि चुलबुली अभिनेत्री सुरभी चंदनासुद्धा विवाह बंधनात (Surabhi Chandana Wedding)अडकली आहे. सुरभीनं नुकतंच तिचा प्रियकर करण शर्मासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    रिपोर्ट्स नुसार, इश्कबाज फेम अभिनेत्री सुरभीनं जयपूरमध्ये प्रियकर करण शर्माबरोबर लग्न केलं. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याला हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक टिव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नात सुरभीने पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता व डोक्यावर पिच कलरची ओढणी घेतली होती; तर करणने ग्रे रंगाची शेरवानी आणि गोल्डन रंगाची पगडी घातली होती. या लूकमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत होते. तर मेहंदीसाठी सुरभीने निळ्या व हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता. तिच्या मेहंदीपासून सप्तपदीपर्यंतचे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फॅन्सपासून ते सेलेब्रिटीही तिला अभिनंदन करताना दिसत आहेत. सुरभीच्या पतीबद्दल सांगायचं तर करण शर्मा हा बिझनेसमॅन आहे. तसेच तो ‘हेवन्स’ नावाची एनजीओही चालवतो.

    सुरभीचं वक्रफ्रंट

    टिव्हीवरील प्रसिध्द अभिनेत्री सुरभीची मोठी फॅन फॅालोविंग आहे. सुरभीनं लोकप्रिय मालिका ‘कुबूल है’ मधून तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या  ‘इश्कबाज’ मालिकेमधून ती घराघरात पोहचली. ‘नागिन’ मालिकेतील तिच्या भूमिकेच चांगलीच कौतुक झालं. आता छोट्या पडद्यानंतर ती ओटीटीवर पदार्पण केलं आहे. ‘रक्षक इंडियाज ब्रेव्स चॅप्टर २’ या सीरिजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली आहे, तिच्यासोबत अभिनेता बरुण सोबतीही यात मुख्य भुमिकेत आहे.