अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढणार ? सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची कारवाई सुरुच

आयकर विभागाचे (IT Action On Sonu Sood)अधिकारी १५ सप्टेंबरपासून सातत्याने सोनू सूद (Sonu Sood)च्या घराची आणि कार्यालयाची चौकशी करत आहेत. आजही हे काम सुरुच आहे.

    बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्या घरी आज तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे(II Survey At Sonu Sood`s Home And Office) सुरू आहे. आयकर विभागाचे अधिकारी १५ सप्टेंबरपासून सातत्याने सोनूच्या घराची आणि कार्यालयाची चौकशी करत आहेत. आजही हे काम सुरुच आहे.

    आयटी अधिकाऱ्यांना हिशोबात फेरफार झाल्याचे वाडत आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे.

    सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. आयकर विभागाची ही कारवाई सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.

    असे म्हटले जात आहे की, सोनूला चित्रपटांमधून मिळालेल्या शुल्कामध्ये कर अनियमितता पाहायला मिळाली आहे. या अनियमिततांनंतर आता आयकर विभाग सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्यांचीही चौकशी करेल. आज या संपूर्ण प्रकरणावर आयकर विभागाकडून निवेदन जारी केले जाऊ शकते. सोनूवर ज्याप्रकारे सातत्याने कारवाई केली जात आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की सोनूच्या अडचणी खूप वाढणार आहेत.