‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्करला जाणार नाही असे म्हणणे चुकीचे होते- अनुपम खेर

मोठ्या पडद्यावर काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे वास्तव दाखवणाऱ्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने जगभरात प्रसिद्धी मिळवली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपने या चित्रपटाबाबत एक विधान केले, ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. अनुरागच्या या वक्तव्यावर 'द काश्मीर फाइल्स' अभिनेता अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    मोठ्या पडद्यावर काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे वास्तव दाखवणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने जगभरात प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. या चित्रपटाला सर्वच स्तरातून भरभरून दाद मिळाली. मात्र, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपने या चित्रपटाबाबत एक विधान केले, ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. अनुरागच्या या वक्तव्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ अभिनेता अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, अनुराग कश्यपने या वर्षीच्या ऑस्करच्या परदेशी श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य चित्रपटांच्या यादीबाबत काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल शंका व्यक्त केली होती. यावर अभिनेते अनुपम खेर यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    अनुरागने या मुलाखतीत सांगितले होते की, मला वाटते की भारताकडून ‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्कर नामांकनासाठी पाठवली जाणार नाही. आता अनुरागच्या या वक्तव्यावर अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनुपम खेर म्हणाले की, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ऑस्कर मिळो की नाही, अनुराग कश्यपने या चित्रपटाबद्दल असे बोलायला नको होते. अनुरागनेही हा चित्रपट पाहिलेला नाही. या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळेल की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण, अनुराग कश्यपने हे चुकीचे विधान केले आहे.