taimur birthday blash

काल करिना आणि सैफच्या मुलाचा म्हणजेच तैमुरचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तैमूरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  पण या वाढदिवासादिवशी लक्ष वेधून घेतलं ते दोन गोष्टींनी. एक म्हणजे तैमूरच्या हातावराचा टॅटू आणि तैमुरच्या वाढदिवसाला आणलेला केक.

तैमूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूरच्या हातावर टॅट्यू काढत असल्याचे दिसत आहे. तैमूरचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर शांत उभा आहे आणि एक व्यक्ती त्याच्या हातावर टॅट्यू काढून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर अतिशय क्यूट दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तैमुरच्या वाढदिवसाला ‘हॅपी बर्थडे टीम’ असे लिहिलेले मोठे फुगे आणि तैमूरच्या फोटोंनी घर सजवण्यात आलं होतं. तैमुरच्या वाढदिवसाचा केकसुद्धा खास होता. घोड्याच्या नाळेचा आकार असलेला केक खास डिझाईन करण्यात आला होता.