Jackie Shroff

‘केबीसी’च्या(kaun Banega Crorepati) शानदार शुक्रवारच्या भागात जॅकी श्रॉफ(Jackie Shroff) आणि सुनील शेट्टी(Sunil Shetty) यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. अमिताभ यांच्या चित्रपटातून आपण कशी ‘भिडू’वाली भाषा उचलली याचं गुपित यावेळी जॅकीनं उलगडलं.

    अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) यांना सर्वजण सुसंस्कृतपणाचे आणि सभ्यपणाचे प्रतीक मानतात, पण जॅकी श्रॉफनं अमिताभ यांच्याच चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन ‘भिडू’ची भाषा(Bhidu language Of Jackie Shroff) उचलली आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती १३’(Kaun Banega Crorepati)च्या मंचावर जॅकीनं स्वत: या गोष्टीचा खुलासा केला.

    ‘केबीसी’च्या शानदार शुक्रवारच्या भागात जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. अमिताभ यांच्या चित्रपटातून आपण कशी ‘भिडू’वाली भाषा उचलली याचं गुपित यावेळी जॅकीनं उलगडलं.

    ही खास ‘भिडू’वाली भाषा कुठून उचलली? असा प्रश्न या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी जॅकीला केला. याचं उत्तर देताना जॅकी म्हणाला की, “सर, मी अशा ठिकाणी राहत होतो की आसपास अशीच भाषा बोलली जात असे. माझे कान उघडे होते, पण तोंड बंद होतं. त्यामुळं माझ्या कानावर जे पडायचं, त्यातून मी बरंच काही शिकलो. शिवाय तुम्ही होतातच! बहुतांशी चित्रपटात तुम्ही असायचात, आम्ही तर मागाहून आलो. तुम्हीच आम्हाला ही ‘भिडू’ भाषा दिलीत. तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे बोलायलाही शिकवलं, पण ही मुंबईची भाषादेखील तुमचीच देणगी आहे. ‘अमर अकबर अँथनी’मध्ये तुमचा एक डायलॉगसुद्धा होता. यावर अमिताभ यांनी तो डायलॉगही म्हटला.