सुकेश चंद्रशेखरविरोधात जॅकलिन फर्नांडिसनची तक्रार, तुरुंगातून आपला छळ करत असल्याचा केला दावा!

जॅकलीननं दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तुरुंगात असूनही सुकेश आपल्याला सतत त्रास देत असून धमक्या देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे.

    गेल्या अनेक दिवसापासुन बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चर्चेत आहे. 200 कोटींच्या लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering case) तिचं नाव समोर आलं होतं. तेव्हापासून तिच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अशातच तुरुंगात असलेला तिचा कथित प्रियकर सुकेश चंद्रशेखर ( Sukesh Chandrasekhar ) तिला तुरुंगातून पत्र लिहीत असल्याचं समोर आलं होतं. पण या पत्राद्वारे सुकेश तिला धमकावत असल्याची तक्रार करत जॅकलिनने त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसात धाव घेतली आहे.

     जॅकलीननं केली तक्रार

    जॅकलीननं दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तुरुंगात असूनही सुकेश आपल्याला सतत त्रास देत असून धमक्या देत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. अधिकृत ईमेल आयडीवरून केलेल्या तक्रारीत अभिनेत्रीने पोलिस आयुक्तांकडे आपल्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण एक जबाबदार नागरिकही असूनही सध्या अशा एका प्रकरणात अडकली आहे ज्याचे परिणाम भविष्यासाठी घातक ठरु शकतात असे ती म्हणाली.

    सुकेश तुरुंगातून आपला छळ करत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. तो मानसिक छळ करत असून सतत धमकावत आहे. असे तिचे म्हणणे आहे की, सुकेश तुरुंगातून तिच्याशी अशा प्रकारे संवाद कसा काय साधू शकतो हेच तिला कळत नाही. पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे.