jaggu ani juliet

अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असलेल्या ‘जग्गू आणि जुलिएट’(Jaggu Ani Juliet) या चित्रपटातील ‘भावी आमदार’ (Bhavi Amdar Song) हे गाणं रिलीज झाल्या झाल्या जोरदार व्हायरल झालंय. त्यामुळे हे गाणं तरूणाईमध्ये धुमाकूळ घालणार असं दिसतंय. या गाण्याने नुकतेच 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

    पुनित बालन स्टुडिओज (Pinit Balan Studios) निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’(Jaggu Ani Juliet) या चित्रपटातील आणखी एक धमाल गाणं आज रिलीज झालं आहे. अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असलेल्या या चित्रपटातील ‘भावी आमदार’ (Bhavi Amdar Song) हे गाणं रिलीज झाल्या झाल्या जोरदार व्हायरल झालंय. त्यामुळे हे गाणं तरूणाईमध्ये धुमाकूळ घालणार असं दिसतंय. या गाण्याने नुकतेच 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

    ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटातील चार धमाकेदार गाण्यांपैकी एक गाणं आज रिलीज झालं. यात उपेंद्र लिमये, अमेय वाघ, वैदेही परशुरामी, जयवंत वाडकर यांच्या सोबत सगळा कोळीवाडा नाचताना दिसतोय. महाराष्ट्रातील काही मतदारसंघात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे गाणं जोरदार व्हायरल होतंय. अतुल गोगावले यांनी गायलेल्या आणि अजय-अतुल याच जोडीच्या अफाट शब्दांमुळे हे गाणं लोकप्रिय होतंय. ‘भावी आमदार’ या भन्नाट गाण्याच्या रूपात आणि थिरकायला भाग पाडणाऱ्या संगीतामुळे पुन्हा एकदा अजय-अतुल यांची हटके कलाकृती प्रेक्षकांसमोर आली आहे.

    ‘जग्गू आणि जुलिएट’मध्ये अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. त्यानंतर आलेल्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटातील राजकीय वाटणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटाला अजय-अतुल यांचं संगीत असल्यानं प्रेक्षक यातील गाण्यांच्या प्रतिक्षेत होते, आणि आता ‘भावी आमदार’ गाणं रिलीज झाल्यानं प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

    ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.