दोन वर्षांनंतर थलाईवाचं कमबॅक, प्रेक्षकांनी चित्रपट घेतला डोक्यावर; पहिल्याच दिवशी जेलरची ‘छप्परफाड कमाई ‘

रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगलीच कमाई केली आहे. थलैवाच्या चित्रपटाचे इंडिया नेट कलेक्शन 43 कोटींहून अधिक आहे.

    दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतच्या (Rajnikant) जेलरने (Jailer Box Office Collection) जगभरातील बाजारपेठेत कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने 95.78 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 29.46 कोटींची कमाई केली. थलायवाच्या या चित्रपटाचे ओपनिंग डे इंडिया नेट कलेक्शन 43 कोटींहून अधिक झाले आहे. चाहत्यांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत. अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.

    जेलरने तोडले रेकॉर्ड

    दोन वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या रजनीकांतकडून अशाच ऐतिहासिक ओपनिंगची अपेक्षा होती.जगभरातील बाजारपेठेत कमाईचे रेकॉर्डही जेलरने मोडले आहेत. व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी चित्रपटाची जगभरातील आकडेवारी शेअर केली आहे. चित्रपटाने 95.78 कोटींचा गल्ला जमवला आहे. जेलर देशातच नव्हे तर परदेशातही कमाईचे विक्रम करत आहेत. चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 29.46 कोटींची कमाई केली. जेलर कॉलिवुडच्या टॉप 3 ओपनर चित्रपटांमध्ये सूचीबद्ध आहे. रजनीकांतची जादू चाहत्यांच्या डोक्यावर बोलत आहे. जेलर हा तमिळनाडूमधील 2023 मधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.

    तगडी स्टारकास्ट

    द जेलरचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केले आहे. रजनीकांत व्यतिरिक्त मल्याळम सुपरस्टार मोहनलाल, कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार यांनी कॅमिओ केले आहेत. जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया आणि विनायकन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. जेलरचे संगीत अनिरुद्ध रविचंद्र यांनी दिले आहे. जेलरची कावला आणि हुकुम ही गाणी ट्रेंड करत आहेत. रजनीकांतचे यापूर्वीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश दाखवू शकले नाहीत, त्यामुळे जेलरने थलैवाच्या कारकिर्दीला संजीवनी दिली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    शुक्रवारी 3 मोठ्या चित्रपटांमध्ये टक्कर

    या शुक्रवारी थिएटरमध्ये 3 मोठ्या चित्रपटांचा टक्कर आहे. जेलरच्या सुटकेनंतर दुसऱ्या दिवशी गदर 2 आणि OMG 2 रिलीज झाले. तीन मोठ्या चित्रपटांच्या संघर्षात, जेलर आतापासून जिंकताना दिसत आहे. गदर 2 ला लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तर OMG 2 ला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर जेलरने बाजी मारली. गदर 2 आणि OMG 2 च्या टक्करमध्ये कोण बाजी मारतो हे पाहावे लागेल.