
रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, आणि तीन दिवसांच्या कमाईसह चित्रपटाने भारतात 108 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
इकडे सुपरस्टार रजनीकांतने दोन वर्षानंतर कमबॅक केलं आणि तिकडे तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये नवनवे रेकॉर्ड बनायला सुरुवात झाली. रजनीकांतचा ‘जेलर’ (Jailer) हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करत आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. भारतासोबतच परदेशातही ‘जेलर’ची जबरदस्त कमाई होत आहे. रजनीकांतसाठी लोकांची क्रेझ आता 3 दिवसांनंतर ‘जेलर’च्या कमाईमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी भारतात 48 कोटींहून अधिक कमावणाऱ्या ‘जेलर’ने 3 दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 29.46 कोटींची कमाई केली.
जेलरने तोडले रेकॉर्ड
थलायवाच्या या चित्रपटाला चाहत्यांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत. अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. गुरुवारी रिलिज झाल्यानंत चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी ‘चित्रपटाने 25.75 कोटी कमावले. मात्र शनिवारने चित्रपटासाठी मोठी झेप घेतली. रजनीकांतच्या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 34 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तीन दिवसांच्या कमाईसह चित्रपटाने भारतात 108 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या गृहराज्य तामिळनाडूमध्ये ‘जेलर’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. केरळमधील रजनीकांत यांचा चित्रपटही या वर्षातील सर्वात मोठा तमिळ चित्रपट ठरला आहे.
जगभरात 200 कोटींची कमाई केली
भारतात 127 कोटींची कमाई करणाऱ्या जेलर चित्रपटाने परदेशातही 95 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 3 दिवसात जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’च्या एकूण कलेक्शनने 222 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन ४ दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार करणार आहे.
यूएसमध्ये, चित्रपटाच्या कलेक्शनने 3 दिवसात 3 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 25 कोटी रुपये) पार केले आहेत. हा चित्रपट आखाती देशांमधील (GCC) सर्वात मोठा तमिळ चित्रपट ठरला आहे. या मार्केटमध्ये रजनीकांतने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. सौदी अरेबिया, कुवेत, UAE सारख्या देशांनी बनलेल्या या सर्कलमध्ये ‘जेलर’चे कलेक्शन 3 दिवसात 3.3 मिलियन डॉलर (27.36 कोटी रुपये) वर पोहोचले आहे. 4 दिवसात चित्रपटाचे परदेशातील एकूण कलेक्शन 130 कोटींच्या जवळ जाणार आहे. GCC मार्केटमधील कोणत्याही तमिळ चित्रपटाचा हा सर्वात मोठा चित्रपट वीकेंड कलेक्शन आहे. यापूर्वी हा विक्रम रजनीकांतच्या ‘2.0’च्या नावावर होता.
रजनीकांतच्या याआधीचे ‘पेट्टा’, ‘दरबार’ आणि ‘अन्नाथे’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर इतका दमदार कलेक्शन केले नाही, जितकी त्याची प्रतिष्ठा आहे. पण आता ‘जेलर’ मधून रजनीकांतने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्याला ‘थलैवा’ का म्हणतात.