‘जवान’च्या कमाईत मोठी झेप, १० दिवस उलटले तरी शाहरुखचा कहर कायम

शनिवारच्या कमाईने शाहरुखने पुन्हा एकदा अनेक मोठे बॉक्स रेकॉर्ड मोडले आहेत.

    जवानची १० दिवसाची कमाई : आजकाल सध्या बॉक्स ऑफिसवर जवान चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या चित्रपटाने लोकांना चांगलेच वेड लावले आहे. जवान चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस झाले मात्र अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. मोठ्या पडद्यावर रोमान्सच्या जादुई दुनियेत नेणारा शाहरुख यावेळी धमाकेदार अ‍ॅक्शनने पडद्यावर आग लावत आहे. त्यांचा मास अवतार जनतेला वेड लावत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

    शनिवारी चित्रपटगृहांमध्ये जवानचा दहावा दिवस होता. लोकांमध्ये आपला दुसरा आठवडा घालवणाऱ्या शाहरुखच्या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप घेतली आहे. शनिवारच्या कमाईने शाहरुखने पुन्हा एकदा अनेक मोठे बॉक्स रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुखच्या चित्रपटाने भारतामध्ये ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे तर ९ दिवसांत या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमधून ३६६ कोटी रुपये कमावले आहेत आणि तेलुगू-तामिळ व्हर्जनमधून ४४ कोटी रुपये कमावले आहेत. शुक्रवारी १९ कोटींच्या कलेक्शनसह चित्रपटाची एकूण कमाई ४१० कोटींवर पोहोचली आहे.

    शनिवारच्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार दहाव्या दिवशी ‘जवान’च्या कमाईत ६०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने ३० ते ३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच शनिवारच्या कमाईनंतर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर ४४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जागतिक बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन ८०० कोटींच्या अगदी जवळ पोहोचले आहे. जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जगभरामध्ये एकूण ८०० कोटींचे कलेक्शन केले आहे.