jaya bachchan

करण जोहरनं (Karan Johar New Film)आपल्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘रॅाकी और रानी की प्रेम कहानी’(Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा केली.यात जया बच्चन (Jaya Bachchan In Negative Role)यांची खलनायकी अदाकारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    अभिनयासोबत राजकारणातही सक्रीय असलेल्या जया बच्चन(Jaya Bachchan In Negative Role) आपल्या चाहत्यांना जणू आश्चर्याचा धक्का देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आजवरच्या करियरमध्ये जया प्रथमच निगेटीव्ह रोल साकारताना दिसणार आहेत.

    जुलै महिन्यात करण जोहरनं (Karan Johar New Film)आपल्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘रॅाकी और रानी की प्रेम कहानी’(Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात रॅाकीच्या भूमिकेत रणवीर सिंग असून, आलिया भट्ट रानीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका असून, यातच जया (Jaya In Negative Role)यांची खलनायकी अदाकारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    पुढल्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात जया षडयंत्र रचणाऱ्या रणवीरच्या आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा पूर्णत: निगेटीव्ह रोल असून, यापूर्वी जया यांनी अशा प्रकारची व्यक्तिरेखा कधीही साकारलेली नाही. इतकंच काय तर त्यांनी काही अंशी निगेटीव्ह कॅरेक्टरही केलेलं नाही. त्यामुळं त्यांना जेव्हा या भूमिकेची ऑफर देण्यात आली, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती… ‘मीच का?’ या प्रश्नाचं उत्तर पटवून देत जया यांना रणवीरच्या आजीच्या भूमिकेसाठी तयार करण्यासाठी करणला खूप मेहनत घ्यावी लागल्याचं समजतं.