“Dont Shout!” पापाराझीवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल…

काल मुंबईत 'द आर्चीज' चित्रपटाचा प्रिमियर पार पडला. यावेळी बच्चन कुटुंबाने हजेरी लावली होती. या प्रीमियरमधील जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जात आहे.

  स्टारकिड्सच्या अभिनयानं सजलेला ‘द आर्चीज’ (The Archies) या चित्रपट येत्या गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शापुर्वी या चित्रपटाचं प्रीमियर मंगळवारी (5 डिसेंबर) मुंबईत आयोजित करण्यात आलं  होतं. या प्रीमियरला बॅालिवुडमधील अनेक दिग्गज सहकुटुंब हजर होते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भुमिकेत आहे. अगत्यासोबत संपूर्ण बच्चन कुटुंब काल उपस्थित होतं. मात्र, काल नेहमीप्रमाणे जया बच्चन पुन्हा पापराझींवर भडकल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. त्यावरुन नेटकरी आता जया बच्चन यांना ट्रोल करण्यात येत आहे.

  पापाराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन

  या प्रीमिअरमधील जया बच्चन यांचा एक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या टिना अंबानी सोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. मात्र, यावेळी पापाराझी जया बच्चन यांना फोटोसाठी हाक मारतात. अशातच जया बच्चन या फोटोग्राफर्सला ‘ओरडू नका!’ असं म्हणताना दिसत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

  ‘द आर्चीज’? चित्रपटाची स्टारकास्ट

  ‘द आर्चीज’ हा चित्रपटाच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर यांची  ‘द आर्चीज’ या चित्रपटात महत्त्वाची भुमिका आहे. याचं  दिग्दर्शन झोया अख्तरने केलं आहे. हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट लोकप्रिय कॉमिक्स आर्चीजवर आधारित असून चित्रपटात आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन या भूमिकांची कथा दाखवण्यात येणार आहे.