jayeshbhai jordaar

‘जयेशभाई जोरदार’(Jayeshbhai Jordaar) हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. वीकेंडलाही हा चित्रपट फारशी कमाई (Jayeshbhai Jordaar Box Office Collection) करु शकला नाही.

  अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) ‘जयेशभाई जोरदार’ (Jayeshbhai Jordaar) हा सिनेमा १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.(JayeshBhai Jordaar Box Office Collection) पण हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. वीकेंडलाही हा चित्रपट फारशी कमाई करु शकला नाही.

  ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ४.७५ कोटींची कमाई केली आहे. त्याआधी शुक्रवारी या सिनेमाने ३.२५ कोटींची कमाई केली होती. शनिवारी ४ कोटींचा गल्ला जमवला होता. अशाप्रकारे आतापर्यंत सिनेमाने फक्त १२ कोटी मिळवले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

  ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्करने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दिव्यांग बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात रणवीर सिंहने गावच्या सरपंचाची भूमिका साकारली आहे. बोमन ईरानी यांनी रणवीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेशभाईच्या पत्नीची भूमिका या सिनेमात साकारली आहे. तसेच रत्ना पाठक आणि दीक्षा जोशी हे कलाकार देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

  सिनेमात रणवीर सिंह एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहेत, जो आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी कठोर संघर्ष करतो आणि बाळाला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो.