‘झिम्मा 2’ सिनेमाची प्रेक्षकांना भुरळ.. 3 दिवसांत कोट्यवधींची कमाई..

हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. ओपनिंगच्या आठवड्यातच म्हणजेच तीन दिवसांतच या सिनेमाने 4.77 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

    Jhimma 2 box office collection: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित झिम्मा 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office collection) कमाल केली आहे. ओपनिंगच्या आठवड्यातच म्हणजेच तीन दिवसांतच या सिनेमाने 4.77 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

    सध्या सोशल मीडियावर एकाच गाण्याचं रील व्हायरल होत आहे. ते म्हणजे मराठी पोरी.. झिम्मा 2 या सिनेमातील गाण्याप्रमाणेच सिनेमाची थिएटरमध्ये हवा आहे. 24 नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अवघ्या तीन दिवसांमध्येच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. हा आकडा येणाऱ्या दिवसांमध्ये वाढेल असं म्हणायला हरकत नाही.

    हेमंत ढोमे दिग्दर्शित या सिनेमाने तरुणाईपासून साऱ्यांनाच वेड लावलं आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनीही प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ते म्हणतात, “प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम समाधान देणारं, सुखावणारं आहे.” सध्या झिम्मा 2 ची संपूर्ण टीम वेगवेगळ्या थिएटर्सना भेट देताना दिसत आहे. काही ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्डही झळकले आहेत. प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून संपूर्ण टीम भारावून गेली आहे. प्रेक्षक सिनेमाच्या टीमला आवर्जून भेटत आहेत. सोशल मीडियावरही झिम्मा 2 च्या सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत.
    झिम्मा’चा पहिला भाग थिएटरमध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक दिवस होता. 50 दिवसांत या चित्रपटाने तब्बल 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

    कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित हा सिनेमाचे निर्माते आहेत ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग. तर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.