
‘जुबली’चा ग्लोबल प्रीमियर 7 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. या वेबसीरिची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे.
अमेझॉन प्राइम व्हिडिओने (Amazon Prime Video) आज आपली आगामी ओरिजनल सिरीज ‘जुबली’च्या (Jubilee) जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. एकूण 10 भागांचा फिक्शनल ड्रामा असलेल्या या सीरिजचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं आहे. या वेब सीरिजमध्ये प्रसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari), अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana), वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूर यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांचा समावेश आहे. ‘जुबली’चा ग्लोबल प्रीमियर 7 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. या वेबसीरिची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे. तसेच, एंडोलन फिल्म्सच्या सहयोगाने रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फँटम स्टुडिओजद्वारा निर्मित या सिरीजची पटकथा आणि संवाद अतुल सभरवाल यांनी लिहिले आहेत.
View this post on Instagram
भारत आणि चित्रपट या दोन्हींच्या विकासाशी समांतर, ‘जुबली’ अशा कथा आणि स्वप्नांचा खुलासा करते ज्यांनी हिंदी चित्रपट उद्योगाला जन्म दिला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या पार्श्वभूमीवर आधारित, ‘जुबली’ रोमांचक आणि काव्यात्मक कथा आहे जी पात्रांच्या एका समुहाभोवती विणलेली आहे आणि त्यांची स्वप्ने, आवड, महत्त्वाकांक्षा आणि प्रेम साध्य करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. अशातच भारत आणि 240 देश आणि प्रदेशांमधील प्राइम सदस्यांसाठी 7 एप्रिल रोजी भाग एक (एक ते पाच भाग) स्ट्रीम करू शकतात, तर भाग 2 (भाग सहा ते दहा) पुढील आठवड्यात 14 एप्रिल रोजी प्रदर्शित केले जातील.
निर्माता आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी म्हणाले, ‘जुबली’ ही एक प्रेमकथा नेहमीच माझ्या मनात राहिली आहे. जेव्हा मी चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर होतो तेव्हा सांगण्यासाठी कोणतीही कथा नव्हती पण ही कथा बनवण्याचा माझा निर्धार होता. सीरिजचा उगम सिनेमाच्या प्रसिद्ध युगातला आहे. ‘जुबली’ही एक अतिशय उत्कृष्ट कथा आहे जी प्रत्येक माणसाबद्दल काहीतरी बोलते. यामुळेच मी कथेकडे प्रथम आकर्षित झालो. आम्ही आपले युग अनुरूप बनवून ठेवण्यासाठी सीरिजमधील प्रत्येक पैलूवर कठोर परिश्रम घेतले आहेत तसेच, संशोधन केले आहे. एका अप्रतिम स्टुडिओच्या समर्थनाने झालेला हा प्रवास उत्कृष्ट आहे, ज्यामध्ये अद्भुत अभिनेता आणि आतापर्यंतची सर्वोत्तम टीमचा समावेश आहे. आम्हाला ही सीरिज बनवताना खूप मजा आली आणि आता जग आमचे काम पाहणार असून, यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”