rakhi and adil

ओशिवरा पोलिसांनी आदिल खानला काल (7 फेब्रुवारी) संध्याकाळी अटक केली होती. त्यानंतर आदिल खानला अंधेरी कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्याच्या आधारे आरोपी आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

  अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी विभक्त झाल्यापासून सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. राखी सावंतनं ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये आदिल खान दुर्रानीच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला होता. त्यानंतर राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानीला (Adil Durrani) अंधेरी कोर्टाने आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  ओशिवरा पोलिसांनी आदिल खानला काल (7 फेब्रुवारी) संध्याकाळी अटक केली होती. त्यानंतर आदिल खानला अंधेरी कोर्टामध्ये आज हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्याच्या आधारे आरोपी आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

  पोलिसांनी राखी सावंतने केलेल्या आरोपांची पडताळणी केली. त्यानंतर आदिलच्या विरोधात याआधी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आदिलला चौकशीसाठी बोलावलं होते.

  राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. आदिल खान हा बंगळुरुमध्ये राहत असून त्याचा कारचा व्यवसाय आहे.

  पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर राखीने आदिलसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल  होत आहेत. राखी सावंतचे आदिलसोबतचे हे दुसरे लग्न आहे. अभिनेत्रीने प्रथम बिझनेसमन रितेशशी लग्न केले. राखी रितेशसोबत बिग बॉसमध्येही दिसली होती, पण त्यांचे नाते काही टिकले नाही. अशा परिस्थितीत रितेश आणि राखीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

  पहिला पती रितेशपासून विभक्त झाल्यानंतर आदिलने राखीच्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा आणला. राखीने आदिलबद्दलच्या तिच्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. राखीने अनेकवेळा सांगितले की ती आदिलवर खूप प्रेम करते आणि आता तिने आदिलशी लग्न करून त्याची कायमचा जीवनसाथी म्हणून त्याच्याशी लग्नगाठ बांधली. आदिलसोबत तिने तिच्या नवीन आयुष्याची आनंदाने सुरुवात केली. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. दोघांमधला वाद आता कोर्टापर्यंत गेला आहे.