
एका रिपोर्टनुसार सलमान खानला जूही चावला एवढी आवडायची की तो थेट जुहीच्या वडिलांजवळ जुहीचा हात मागायला गेला. एका मुलाखतीत सलमान खानने (Salman khan) याबाबात स्वतः खुलासा केला होता.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला (Juhi Chavla) आज १३ नोव्हेंबर रोजी तिचा ५५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. जूहीने आपल्या अभिनयाने ८० आणि ९० चे दशक गाजवले असून ती त्याकाळी प्रत्येकाच्या आयुष्यातील ड्रिम गर्ल होती.
मॉडलिंगच्या जगात चांगले नाव कमावल्यावर जूहीने १९८७ साली रिलीज झालेल्या ‘सल्तनत’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जूही चावलाने ‘डर’, ‘दीवाना मस्ताना’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार’ सारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. जूही चावलाने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहता यांच्यासोबत लपून लग्न केले होते. मात्र त्याआधी जूहीचे नाव सलमान खान सोबतही जोडले गेले.
अभिनेत्री जूही चावला हिच्यासोबत लग्न करावं अशी सलमान खानची इच्छा होती. मात्र जूही चावलाच्या वडिलांमुळे हे प्रकरण पुढे आले नाही आणि जुहीने लग्नाला नकार दिला. एका रिपोर्टनुसार सलमान खानला जूही चावला एवढी आवडायची की तो थेट जुहीच्या वडिलांजवळ जुहीचा हात मागायला गेला. मात्र जूही चावलाच्या वडिलांनी सलमानला नकार देऊन त्याचा प्रस्ताव नाकारला. एका मुलाखतीत सलमान खानने (Salman khan) याबाबात स्वतः खुलासा केला होता.
सलमान म्हणाला, “जूही खूप छान आहे. मी तिच्या वडिलांना विचारले होते की तुम्ही जुहीला माझ्यासोबत लग्न करुन द्याल का त्यावर तिच्या वडिलांनी नकार दिला होता. कदाचित त्यांना मी आवडलो नाही. माहित नाही त्यांना कसा मुलगा हवा होता?”. सलमान खान अजूनही अविवाहित असून जूही चावला तिचे पती जय मेहेता यांच्यासोबत तिच्या संसारात खुश आहे.