
तुमचे सांधे जॅम होऊ लागतात. तुमच्या शरीराचा एक-एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो. हे ऐकुन उरलं सुरलं अवसान गळून गेलं होतं.
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी गेल्याकाही वर्षांपासून दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. या आजारपणाबाबत जुईने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सविस्तर सांगितले आहे. या आजारावर तिने कशी मात केली, यासाठी तिला काय काय सहन करावे लागले हे तिने नवराष्ट्रशी शेअर केलं…
“वो स्त्री है! कुछ भी कर सकती है!!
आज तुमच्याशी मनातली एक गोष्टं सांगणार आहे
आणि हि गोष्टं माझीच आहे! एकही शब्दं खोटा नाही! पण शेअर करावीशी वाटली. कारण यातून कोणाला प्रेरणा मिळू शकते! उभं राहण्यासाठी!!!
२०१३ साली सहयाद्री वाहिनीचा कार्यक्रम करून घरी येत असताना पाऊलं इतकी सुजली की, चपलेशिवाय गाडी चालवावी लागली. मला वाटलं कार्यक्रमामुळे पाय सुजले असतील. होतील बरे. मी घरी आले आणि झोपले. सकाळी मला ऊठताच येईना. मान पाठ अवघडलेली.
मला काही सुचेना. ‘पुढचं पाऊल’चं शुटींग तेव्हा सुरु होतं. बरं नाही आज येत नाही असं सांगून सुट्टी घेणं या फिल्डमध्ये शक्य नसतं! पण तरीही मी विचारून बघितलं आणि मला सुट्टी दिली गेली. आईने मला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टरांनी टेस्ट करुन एक्सरे काढायला सांगितला.. एक्सरे बघून म्हणाले “मला वाटलं होतं तेच झालय.. MRI आणि ब्लड टेस्ट करायला सांगिल्या. मी आणि आई फूल टेन्शनमध्ये! MRI झाला. पहिल्यांदा त्या MRI च्या बोगद्यात जाताना अटॅक येतो की काय? अशी स्थिती झाली होती माझी. रिपोर्टमध्ये कळलं की, मणक्यात Cervical, lumbar मध्ये Cord compression (मणक्या खालची मऊ गादी फाटुन त्या खालच्या मेंदुला जाणाऱ्या नसा दाबल्या जाताहेत), आणि मणका सरळ झालाय असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यातले काही मणके एकमेकांना चिकटलेले. MRI मध्ये स्पष्टं दिसत होते! “Physio therapy करावी लागेल. spine Damage बघता surgery करावी लागेल. पण तुमचं वय खुप कमी आहे. २४वर्ष म्हणून surgery नाही सांगणार” असं डॉक्टर म्हणाले. “तुमचा अपघात झाला होता का? कधी जोरात पडलात का?” असंही त्यांनी विचारलं. मी आणि आई पटकन म्हणालो “कधीच नाही”! डॉक्टरांनी औषधं लिहुन दिली आणि एक महिना Bedrest सांगितली!! आजारापेक्षा जास्तं टेन्शन मला सुट्टी मिळणार नाही याचं आलं! सुट्टी मिळाली नाही. पण सीन कमी करुन सेटवर दर सीन नंतर आडवं होता येईल अशी सोय करून देण्यात आली. ब्लड रिपोर्टस आले. Calcium, D3, B12, haemoglobin below low level तर मला thyroid आहे असं कळलं. अजून एक भर! (त्या दरम्यान माझं वजन ६ किलो वाढलं होतं, केस, भुवया, पापण्या गळत होत्या). मला कळेना हे सगळं अचानक का? मला जीम, डान्स, ट्रेकिंग सगळं बंद करायला सांगितलं. जमीनीवर बसायचं नाही, वजन ऊचलायचं नाही, पळायचं नाही, वाकायचं नाही, अशी कुठलीच गोष्टं करायची नाही ज्याने मणक्याला त्रास होईल असं सांगितलं! मी मुळात उडाणटप्पु. त्यामुळे डिप्रेशन जास्तं आलं. या सगळ्याशी जुळवत ४ वर्ष गेली. सुधारणा एवढीच होती की दुखणं कमी झालं होतं. काही दिवसांनी माझ्या मासिक पाळीचा त्रास सुरु झाला. तेव्हा मी ‘पुढचं पाऊल’ मालिका सोडली. खुप कठीण दिवस होते ते. कोणाला काही सांगताही येईना.
माझ्या गायनॅकने काही टेस्ट सांगितल्या. Brain MRI सांगितला आणि तिथे मी खरी घाबरले. टेस्ट झाल्यावर Radiologist म्हणाले डॉक्टरांना दाखवुन घ्या. Problem आहे आणि मी थरथरायला लागले. नेरुळ ते ठाणे हा प्रवास तेव्हा १० तासांचा वाटला. माझ्या
गायनॅककडे गेले. तेव्हा तिने मला सांगितलं “टेन्शन घ्यायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही, सगळ्यांनाच मुलं-बाळं होतात असं नाही, सायन्स आहेच, त्यावरुन आपण प्रयत्न करु शकतो. मी म्हंटलं झालंय काय नक्की??? त्यावर त्या म्हणाल्या “ तुला Prolactin Tumour आहे
Pitutory मध्ये. “ मी आणि आई गप्पं… कारण, कळ्ळतच नव्हतं. नक्की काय झालंय!! मग डॉक्टरांनी समजावल्यावर त्याची गंभीरता कळली आणि तेव्हा मी थोडीशी खचले! हो थोडीच. कारण पुढे अजून मोठी परीक्षा येणार होती. मी तेव्हा हा विचार केला नाही की, मुलं-
बाळ होईल ना होईल, पण तेव्हा सगळ्यात जास्तं महत्त्वाचं होतं स्ट्राँग होऊन सगळं स्वीकार करणं. मला खुप वाईट वाटलं. पण मला स्वतःसाठी ऊभं राहायचंच होतं. माझी तीही ट्रीटमेंट सुरु झाली. आठवड्याला एक गोळी होती ट्युमरची. पण त्याचा खुप त्रास व्हायचा.
मळमळ, चक्कर सतत सुरु आणि अशा सगळ्यात रोजचं शुटींग. या सगळ्यात मी फिट राहण्यासाठी डॉक्टरांना विचारुन काय exercise करता येईल हे शोधून काढलं. spinning (heavy cardio) सुरु केला. मला बरं वाटू लागलं! मी स्वतःसाठी काहीतरी करत होते. रडत
न बसता. हळुहळु २ वर्ष गेले. वजन कमी झालं. ब्लड रिपोर्टस नॉर्मल आले. पण एक दिवस अचानक मला चक्करेचा मोठा झटका आला. मी झोपल्या जागी सतत कुशीवर वळत होते. सगळं फिरत होतं. मला प्रचंड ढवळत होतं. इतकं की मी स्वामी समर्थांचा जप सुरु
केला. मला वाटलं मी आता यातून काय बाहेर येत नाही. पण चमत्कारासारंखी चक्कर कमी झाली. पण जीभ जड होती. २-३ तासांनी त्यावर कंट्रोल आला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी काही physical tests केल्या आणि सांगितलं मणक्याच्या त्रासामुळे Positional
Vertigo episodes होताहेत. त्यावर ते म्हणाले, काळजी घ्यायला हवी खूप. मी परत लेव्हल झिरोला आले. हे सगळं का? मीच का? असे अनेक विचार येऊ लागले. मी हळुहळु डान्स सुरु केला होता. तो परत बंद झाला. माझं जे जे पुर्ववत होत होतं. त्यावर परत बंधनं
आली. मी पूर्ण खचले. मला chiropractor कडे जावं लागायचं पुण्याला.. तिथे ते माझ्या मानेत dry needeling करायचे! सुया मानेच्या muscles मध्ये घालुन bloodflow stimulate करायचे. मी थकले होते या सगळ्याला. विचार करुन डोकं सुन्नं व्हायचं. एक दिवस सगळ्या गोळ्या औषधं फेकुन दिली. prescribtion papers फाडुन टाकले आणि स्वतःला सांगितलं you have been a fighter since childhood! आधीच 6-7 वर्ष यात गेली! पुढचं आयुष्य यात घालवायचं नाहीये! आणि कामाला लागले. नियमित योग, शाकाहारी आहार, lifestyle change हे सगळं सुरु केलं. बरं हे सगळे त्रास सुरु असताना शूटिंग सुरु होती. हवा तसा आराम मिळत
नव्हता. हे सगळं थांबतच नव्हतं. गोळ्यांच्या हिटमुळे इन्फेक्शनस, एसिडिटी सतत सुरु होतं. महीन्यातले ४-५ दिवसच मान डोकं दुखत नसेल. बाकी कधीही migraine attack १५-२० दिवस सुरुच. तेव्हा माझ्या Brain surgeon ने मला blood inflamation test
करायला सांगितली आणि यात continuous bone loss (हाडांची सतत होणारी झीज) चा खरा छडा लागला. मी RA positive होते. आजही आहे. RA (rheumatoid arthritis). हा असा आजार आहे जो बरा होत नाही म्हणे! हा Auto immune disease आहे.
Heridetary असतो. या आजारात तुमची ईम्युन सिस्टीमच तुमच्या चांगल्या टीश्यु वर attack करत राहाते. तुमचे सांधे जॅम होऊ लागतात. तुमच्या शरीराचा एक-एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो. हे ऐकुन उरलं सुरलं अवसान गळून गेलं होतं. पण मी मनाशी
एक गोष्टं ठरवलं होतं. काही झालं, कितीही शरीर आखडलं तरी नियमित व्यायाम करायचाच. मग कोविडचं वादळ सुरु झालं. मी एकटीच ठाण्यातल्या घरी अडकले. माझ्या ८ मांजरीं बरोबर. सुदैवाने लॉकडाऊन आधीच ४ पिल्लं झाली होती. त्यामुळे माझा पूर्ण लॉकडाऊन
माझ्या बाळांच्या संगोपनात गेला. मांजरांच्या पिल्लांची का होईना, मी आई झाले. दुखण्याकडे लक्ष कमी होत गेलं. दुखणं कमी होत गेलं. मी नियमित व्यायाम करु लागले. आता व्यायामानंतर मला मानेत, पाठीत दुखत नाही. एकावेळेला सहज १०८ सुर्यनमस्कार मी घालते. माझा आजार बरा झालाय असं नाही. पण दुखणं नक्कीच कमी झालंय!! माझ्यासाठी हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. काही लोकांनी माझी “रोगट” म्हणून चेष्टाही केली. पण आपल्या पाठिशी आपल्या गुरुचं बळ असेल तर काहीही शक्य आहे! फक्तं विश्वास हवा आणि या प्रवासात कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी हवे! त्यांच्याबद्दल लवकरच सविस्तर लिहेन! स्त्री ही सक्षम असतेच! पण तिला असं ज्यांनी केलय त्यांना विसरुन चालणार नाही.मी आज माझी कथा तुमच्याशी आपुलकीने शेअर केली. कारण अशी अनेक माणसं असतील जी वेगवेगळी दुखणी सहन करत असतील. त्यांना प्रेरणा मिळेल…Sending u all positive vibes….