महेश मांजरेकर यांच्या आवाजातील ‘जुनं फर्निचर’ मधील ‘काय चुकले सांग ना ?’ गाणं प्रदर्शित!

गाण्याबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, '' या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणारे हे गाणे आहे.

    ”सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत, यतिन जाधव निर्मित ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता ‘जुनं फर्निचर’ मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘काय चुकले सांग ना ?’ असे या गाण्याचे बोल असून यांनी वैभव जोशी हे गाणे शब्दबद्ध केले असून डीएच हार्मोनी एसआरएम एलियन यांनी संगीत संयोजन केले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर (Mahesh Manjekara) यांचा आवाज लाभला आहे.

    या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

    गाण्याबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ” या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणारे हे गाणे आहे. हे गाणे मला गायला मिळाले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मनातील घालमेल आणि मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत. हे गाणे म्हणजे चित्रपटाचा कणा आहे. चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीची लाभली आहे.”