जस्टिन बीबरच्या घरी हलणार पाळणा, पत्नी हेलीसह फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुड न्यूज!

जस्टिन आणि हेलीने त्यांच्या लग्नाची एक छोटी क्लिप त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यामध्ये दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हेलीने पांढऱ्या लेसचा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे.

  आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) त्याच्या गाण्यांनी लाखो हृदयांवर राज्य करतो. त्याच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त, गायक त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत आहे. आता बातमी अशी आहे की पॉप सुपरस्टार जस्टिन बीबर आणि त्याची मॉडेल पत्नी हेली बीबर लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करणार आहेत. जस्टीन ही आनंदाची बातमी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून चाहत्यांसह शेअर केली आहे.

  जस्टिन आणि हेलीने चाहत्यांना दिली गुडन्यूज

  जस्टिन आणि हेलीने त्यांच्या लग्नाची एक छोटी क्लिप त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यामध्ये दोघं लग्न करताना आणि किस करताना दिसत आहेत. हेलीने पांढऱ्या लेसचा ड्रेस घातला होता जो तिचा बेबी बंप दर्शवित होता, तर जस्टिनने हिवाळ्यातील जाकीट, टी-शर्ट आणि बॅगी पॅन्ट घातली होती. तिचा बेबी बंप पाहून तिचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.

  सोशल मीडियावर फोटो व्हायरल

  जस्टिनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याला शुभेच्छा देण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्याच्या पोस्टनंतर अनेक सेलेब्रिटींनी त्याला आणि हेलीला अभिनंदन केलय. किम कार्दशियन, केंडल जेनर, गिगी हदीद आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले. तसेच, चाहत्यांनीही जस्टिन आणि हेलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Justin Bieber (@justinbieber)