जस्टीन बिबरच्या चेहऱ्याला अर्धांगवायू, भारतातील शो रद्द होणार, चाहत्यांची निराशा

माझी प्रकृती खूप गंभीर असल्याने मी शो करू शकत नाही, त्यामुळे मी काही शो रद्द केले आहेत. त्यासाठी मी चाहत्यांची माफी मागतो असे देखील बिबर याने म्हटले आहे.

    अल्पावधीत लोकप्रिय होणाऱ्या अमेरिकन गायक जस्टीन बिबरबाबत (Singer Justin Bieber) मोठी बातमी समोर येत आहे. जस्टीनच्या चेहऱ्याच्या काही भागाला अर्धांगवायू झाल्याची माहिती त्याने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले आहे की, मला रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt Syndrome) नावाच्या आजाराचे निदान झालं आहे. त्यामुळे चेहऱ्याचा काही भाग पॅरालाईज झाला आहे.

    सध्या जस्टीनवर उपचार सुरू आहेत. या आजारातून बरं होण्यासाठी वेळ लागणार असल्याने आपण कामातून ब्रेक घेत असल्याचे देखील त्याने यावेळी सांगितले. त्याने आपले सर्व शो रद्द केले आहेत. त्याने या व्हिडीओमध्ये आपल्या चहात्यांची देखील माफी मागितली आहे. माझी प्रकृती खूप गंभीर असल्याने मी शो करू शकत नाही, त्यामुळे मी काही शो रद्द केले आहेत. त्यासाठी मी चाहत्यांची माफी मागतो असे देखील बिबर याने म्हटले आहे.