k l rahul and athiya shetty

के एल राहुल (K L Rahul)आणि अथिया शेट्टीचं (Athiya Shetty) लग्न 23 जानेवारीला होणार आहे. या लग्नासाठी आणि आधीच्या फंक्शन्ससाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना फक्त आमंत्रित करण्यात आलं आहे.

  भारतीय क्रिकेट संघातील विकेटकीपर आणि फलंदाज के एल राहुल (K L Rahul) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तो आपली गर्लफ्रेंड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत (Athiya Shetty) लग्न करणार आहे. या विवाह सोहळ्यातील कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये कॉकटेल पार्टी, मेहंदी आणि हळदी समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. (K L Rahul And Athia Shetty Wedding Programs)

  राहुल आणि अथियाचं लग्न 23 जानेवारीला होणार आहे. या लग्नासाठी आणि आधीच्या फंक्शन्ससाठी फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना फक्त आमंत्रित करण्यात आलं आहे. अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार आहेत. सुनील शेट्टी यांच्याकडून आणि के एल राहुलच्या कुटुंबाकडून लग्नाची सगळी तयारी करण्यात आली आहे.

  तीन दिवस चालणार विवाह सोहळा
  या विवाह सोहळ्याबाबत खूप गोपनीयता पाळण्यात येत आहे. हे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यामध्ये होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे प्रोग्राम्स आजपासून सुरु होणार आहेत. आज कॉकटेल पार्टी ठेवण्यात आली आहे. या पार्टीने लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर रविवारी 22 जानेवारीला मेहंदी आणि हळदी समारंभ होणार आहे. हळदी आणि मेहंदी समारंभालादेखील मोजकेच नातेवाईक उपस्थित असणार आहेत. त्यानंतर 23 जानेवारी हा दिवस के एल राहुल आणि अथिया शेट्टीसाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण या दोघांचं लग्न 23 जानेवारीला होणार आहे.

  मुंबई आणि बँगलोरमध्ये रिसेप्शन
  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर के एल राहुल आणि अथिया शेट्टीचे कुटुंबीय मित्र-मैत्रीणी आणि नातेवाईकांसाठी दोन वेडिंग रिसेप्शन ठे‌वणार आहेत. ही दोन्ही रिसेप्शन मुंबई आणि बँगलोरमध्ये होणार आहेत. या रिसेप्शनमध्ये क्रिकेट टीमचे स्टार खेळाडू, बॉलीवूड कलाकार, उद्योगपती आणि राजकीय नेत्यांना आमंत्रित केलं जाईल.

  केएल राहुलने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध वन डे मॅच सीरिज खेळली होती. त्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध तीन मॅचची वन डे सीरिज खेळणार आहे. राहुलने आधीच लग्नासाठी म्हणून या सीरिजमधून सुट्टी घेतली आहे.

  तीन वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न
  के एल राहुल आणि अथिया शेट्टी हे तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची अफवा आधी पसरली होती. तसेच दोघेही साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाट साउथ इंडियन पद्धतीने पार पडणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या.