k l rahul and athiya shetty wedding

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज भारतीय क्रिकेटपटू के एल राहुल (K L Rahul) यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

  बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलसोबत (K L Rahul) विवाहबंधनात अडकणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पर पडणार आहे. (K L Rahul And Athiya Shetty Wedding)  अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यामध्ये हे लग्न होणार आहे. या लग्नाला फक्त 100 लोक उपस्थित राहतील. लग्न झाल्यानंतर ते दोघं मीडियाशी बातचित करणार आहेत.

  सेलिब्रिटींचा सहभाग आणि दाक्षिणात्य साज
  या लग्नात शाहरुख खान, सलमान खानपासून अनुष्का शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी असे सेलिब्रिटी सामील होतील. मात्र या लग्नासाठी के एल राहुलचा खास मित्र विराट कोहली उपस्थित राहणार नाही. विराट इंदौरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याची तयारी करत आहे. केळीच्या पानावर या सगळ्यांना जेवण वाढलं जाणार आहे. तसंच खास साऊथ इंडियन अन्नपदार्थ या सोहळ्यासाठी तयार केले जाणार आहेत.अथिया आणि के एल राहुल यांच्या लग्नातील ड्रेस सब्यसाचीने डिझाईन केला आहे. अथिया व्हाईट आणि गोल्डन आऊटफिटमध्ये दिसेल.

  अथिया शेट्टी आणि के एल राहुलच्या लग्नात सगळे क्रिकेटर्स उपस्थित राहू शकणार नाहीत. कारण सगळे न्यूझीलंडविरुद्धच्या क्रिकेट सीरीजमध्ये व्यस्त आहेत. आयपीएल संपल्यानंतर मे महिन्यात भारतीय टीमसाठी खास रिसेप्शन आयोजित केलं जाणार आहे.

  अथिया शेट्टीच्या लग्नासाठी अजय देवगणने खास ट्वीट केलं आहे.

  या विवाह सोहळ्याबाबत खूप गोपनीयता पाळण्यात आली आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यामध्ये लग्नाचे प्रोग्राम्स 21 जानेवारीपासून सुरु झाले होते. या दिवशी कॉकटेल पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीने लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर रविवारी 22 जानेवारीला मेहंदी आणि हळदी समारंभ झाला आहे. हळदी आणि मेहंदी समारंभालादेखील मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर आज 23 जानेवारीला मुख्य विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

  के एल राहुल आणि अथिया शेट्टी हे गेल्या तीन -चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची अफवा आधी पसरली होती.