प्रसिद्ध के-पॉप सिंगर पार्क बो रामचा मृत्यू, वयाच्या अवघ्या 30 वर्षी घेतला जगाचा निरोप!

पार्क बो राम (Bo Ram) या गायिकेने वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

  मनोरंजन जगातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध के-पॉप म्युझिक बँडचे जगभरात चाहते आहेत. या म्युझिक बँडच्य एका गायिकेचा मृत्यू झाला आहे. पार्क बो राम (Bo Ram) या गायिकेने वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूच्या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलं नाहीये. तिच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  साऊथ कोरियाची प्रसिद्ध गायिका पार्क बो राम ही केवळ 30 वर्षाची होती. पार्क तिच्या करिअरमध्ये लवकरच 10 वर्षे पूर्ण करणार होती आणि ती एका सेलिब्रेशनची देखील तयारी करत होती. ती तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओवर काम करत होती, पण त्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला.

  XANADU एंटरटेनमेंटने सांगितले की, आम्ही अत्यंत दुःखद बातमी शेअर करत होता. पार्क बो राम हिचे 11 एप्रिल रोजी निधन झाले. दरम्यान ही बातमी ऐकताच सर्वांना एकच धक्का बसला आहे. तसेच तिच्या पार्थिवावरही लवकरच अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by 박보람 (@ramramram2)

  मित्रांसोबत पार्टीत दंग होती पार्क बो राम

  ‘AllKpop’ च्या अहवालात असे म्हटले आहे की, नामयांगजू पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एक अहवाल दाखल केला आहे. ज्यात दावा केला आहे की पार्क बो राम तिच्या मृत्यूच्या काही तास आधी एका पार्टीत होती. तसेच ती पार्टीत दारुचे देखील सेवन करत होती, अशी माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, रात्री 9:55 वाजता वॉशरूममध्ये ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॅाक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.