रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफनंतर आता अभिनेत्री काजोल डिपफेक तंत्रज्ञानाला पडली बळी, व्हिडिओ व्हायरल!

या व्हिडिओमध्ये काजोलच्या चेहऱ्याचा गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये काजोलचा चेहरा मॉर्फ करून वापरण्यात आला आहे.

  अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या डिपफेक व्हिडिओनंतर (Rashmika Mandana fake video)  कतरिना कैफच्या (Katrina Kaif’s photo) फोटोसोबत छेडछाड करण्यात आली होती. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणीही रश्मिकाने केली होती. त्यानंतर आता अभिनेत्री काजोलचा एका डीपफेक व्हिडिओ सध्या (Kajol Deepfake Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.

  काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

  नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर कपडे बदलणारी महिला दुसरी कोणी नसून काजोल असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये काजोलच्या चेहऱ्याचा गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये काजोलचा चेहरा मॉर्फ करून वापरण्यात आला आहे.

  व्हिडिओमागचं सत्य काय?

  बूम या वेबसाइटने या व्हिडिओमागील खरे सत्य शोधून काढले आहे आणि तथ्यही तपासले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्याचा असून या डीपफेक व्हिडिओमध्ये काजोलचा चेहरा मॉर्फ करून वापरण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काजोलच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली असून या व्हिडीओवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही अनेक जण करत आहेत.

  मूळ क्लिपमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रोझी ब्रीन आहे.  ‘गेट रेडी विथ मी’ ट्रेंडचा भाग म्हणून तिने टिकटोकवर क्लिप शेअर केली आहे. हा व्हिडिओ 5 जून रोजी टिकटोकवर अपलोड करण्यात आला होता.