
एका युजरनं केलेल्या कमेंटवर काम्या पंजाबी (kamya Panjabi Angry On Trollers) चांगलीच भडकली आहे. तिनं तिथल्या तिथे संबंधित ट्रोलरला प्रत्युत्तर देत परखड शब्दांमध्ये सवाल केले आहेत. काम्या पंजाबीला तिच्या पहिल्या लग्नावरून(kamya Panjabi Trolled For First Marriage) खोचक शब्दांत चिडवणाऱ्या या कमेंटवर काम्यानं लगेच प्रत्युत्तर दिलं आहे.
अभिनेत्री काम्या पंजाबी(Kamya Panjabi) ही तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे किंवा तिच्या विधानांमुळे कायम चर्चेत असते. यामुळे अनेकदा सोशल मीडयावर (Social Media)तिला ट्रोल देखील केलं जातं. नुकताच काम्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर एका युजरनं केलेल्या कमेंटवर काम्या पंजाबी (kamya Panjabi Angry On Trollers) चांगलीच भडकली आहे. तिनं तिथल्या तिथे संबंधित ट्रोलरला प्रत्युत्तर देत परखड शब्दांमध्ये सवाल केले आहेत. काम्या पंजाबीला तिच्या पहिल्या लग्नावरून खोचक शब्दांत चिडवणाऱ्या या कमेंटवर काम्यानं लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हेच उत्तर आता चर्चेत आलं आहे.
View this post on Instagram
काम्यानं बुधवारी म्हणजेच ८ डिसेंबरला तिच्या इन्स्टाग्रमा अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. महिला सशक्तीकरणाबाबत काम्या या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. याच व्हिडीओवर एका युजरनं तिला ट्रोल करणारी कमेंट केली होती. “आपलं स्वत:चं लग्न वाचवू शकली नाहीस.. घटस्फोट झाला. नंतर दुसरं लग्न केलंस. हे अतीच झालं”, असं या युजरने म्हटल्यानंतर काम्या त्याच्यावर संतापली.
#लड़की_हूँ_लड़_सकती_हूँ pic.twitter.com/nCYgUQkB4o
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) December 8, 2021
काम्यानं तिथेच या युजरच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. “मग काय? मला आनंदी राहाण्याचा किंवा जगण्याचा काहीच अधिकार नाही का? घटस्फोट झाला म्हणून महिलांनी मरायचं का? घटस्फोटामुळे एखाद्या महिलेचं आयुष्य संपून जातं का? तुमच्यासारखा विचार करणाऱ्या लोकांविरोधात प्रत्येक महिलेनं आवाज उठवायला हवा आणि त्या तसं करतही आहेत. मला कमजोर समजू नका. मी मुलगी आहे, लढू शकते”, असं काम्या म्हणाली आहे.
काम्या पंजाबीचं २००३मध्ये बंटी नेगीसोबत लग्न झालं होतं. २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना आरा नावाची एक मुलगी देखील आहे. घटस्फोटानंतर सात वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी काम्यानं शलभ दंगसोबत दुसरं लग्न केलं. तेव्हा देखील काम्या पंजाबीवर दुसऱ्या लग्नामुळे बरंच ट्रोलिंग झालं होतं.