‘पठाण केवळ सिनेमाच, गर्जणार तर जय श्रीरामच’, ट्विटवर परतलेल्या कंगनाचा पहिला बॉम्ब

पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणारे सर्वजण सहमत आहेत, पण कोणाचे प्रेम कोणाच्या द्वेषावर? असा सवाल तिने केला आहे.

    शाहरुख खानचा पठाण (Pathaan ) हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होताच बॉयकॉट गँगची बोलती बंद झाली आहे. सर्व वादांमध्येही या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांच्या जबरदस्त रिव्ह्यूसोबतच नुकतच कंगना राणौतनेही शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचं कौतुक केलं होत. त्यामुळे चाहत्यांनी कंगनाला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. चाहत्यांना विश्वास आहे की ती एक मोठी टर्नर आहे जी क्षणात तिचे विधान बदलू शकते, आणि आता पुन्हा तसेच झाले आहे. कंगनाने पुन्हा एकदा ट्विट करत पठाण सिनेमावर टिका केली आहे. 

    काय म्हणाली कंगना

    सगळीकडून पठाणच्या कौतुकाबद्दल ऐकून कंगणाने पुन्हा नवं वक्तव्य केलं आहे. ज्यांना मोठ्या आशा आहेत त्यांनी कृपया नोंद घ्यावी की, पठाण फक्त एक चांगला सिनेमा होऊ शकतो मात्र, इथे जय श्री राम नामाचाच जयजयकार होणार

    पठाण चित्रपट द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा नेटकरी म्हणत आहे. याबाबत कंगना रानौतनेही सूर मिसळला आहे. ‘पठाण चित्रपट द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्यांसोबत मी सहमत आहेत, पण कोणाचे प्रेम कोणाच्या द्वेषावर? असा सवाल तिने केला आहे. जे लोकं तिकीट खरेदी करून ते यशस्वी करत आहे ते? चित्रपटाचं नाव  पठाण नाव असंंलं तरी 80% टक्के हिंदू असलेल्या देशातील लोकांच प्रेम आणि सर्वसमावेशकेमुळे हे घडतयं, असं तीने म्हण्टलंय.

    यापुर्वीही केलं पठाण चित्रपटाचं कौतुक

    शाहरुख खानच या चित्रपटातून पुनरागमन होणं त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही आहे आणि याची प्रचिती आता सिनेमाघरातील गर्दी पाहून होत आहे. सामान्यापासून ते बॅालिवूड जगतातील प्रत्येकजण  पठाण चित्रपटाच कौतुक करताना दिसत आहे. कंगनानेही एका कार्यक्रमादरम्यान पठाण चित्रपटाचं कौतुक केलं होतं. ती म्हणाली, ‘आपली इंडस्ट्रीला वाईट काळ पाहाव लागत आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी असे पठाणसारखे चित्रपट तयार केले पाहिजेत.अशा चित्रपटांमुळे लोक पुन्हा बॉलिवूडकडे वळतील. त्यामुळे पठाण सारखे चित्रपट चालले पाहिजेत. जेणेकरून आपला हिंदी चित्रपट उद्योग जो थोडा मागे पडला आहे, तो पुन्हा रुळावर येऊ शकेल.