kangana ranaut and urfi javed

उर्फी आणि कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्यातल्या ट्वीटची चांगलीच चर्चा सुरु आहे. बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगनाची नुकतीच ट्विटरवर वापसी झाली आहे. दरम्यान यावेळी उर्फी थेट कंगनाची थट्टा करताना दिसली. (Urfi Javed Vs Kangana Ranaut) दोघींमधला हा ट्विटर संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनेकदा टीका केली आहे. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलंच ट्विट वॉर काही दिवस सुरु होतं. त्यामुळे उर्फी चांगलीच चर्चेत आली होती. आता उर्फी आणि कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्यातल्या ट्वीटची चांगलीच चर्चा सुरु आहे. बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगनाची नुकतीच ट्विटरवर वापसी झाली आहे. दरम्यान यावेळी उर्फी थेट कंगनाची थट्टा करताना दिसली. (Urfi Javed Vs Kangana Ranaut) दोघींमधला हा ट्विटर संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    एक ट्वीट शेअर करत कंगनाने म्हटले होते की, या देशातील लोक सगळ्या खानांवर प्रेम करतात आणि त्यांना फक्त मुस्लीम अभिनेत्रीच आवडतात. यावर उर्फीने देखील प्रतिक्रिया दिली. उर्फी म्हणाली की, ‘हे कसले विभाजन.. हिंदू कलाकार, मुस्लीम कलाकार. कला कधीच धर्मात विभागली जाऊ शकत नाही. सगळेच कलाकार आहेत.’ यानंतर दोघींमध्ये ट्वीटरवर चांगलंच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.

    कंगनाने देखील उर्फीला उत्तर देत म्हटले की, “प्रिय उर्फी तुझा विचार चांगला आहे. मात्र, त्यासाठी आपल्या देशाला युनिफॉर्म सिव्हील कोडची गरज आहे. तो येईपर्यंत राज्यघटनेनुसार देश या दोन भागांमध्ये विभागलेला राहील. सगळ्यांनी मिळून २०२४ पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू व्हावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करूया.” यावर देखील उर्फीने प्रतिक्रिया दिली. उर्फी ट्वीट करत म्हणाली, ‘युनिफॉर्म ही संकल्पना माझ्यासाठी फार चांगली नाही मॅडम.. मी तर माझ्या कपड्यांमुळे लोकप्रिय आहे.’

    कंगनाने म्हटलेल्या ‘युनिफॉर्म सिव्हील कोड’चा अर्थ आहे समान नागरी कायदा. मात्र, उर्फीने युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ कपड्यांशी लावल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलं. मात्र, यानंतर स्वतः उर्फीने पुन्हा एकदा ट्वीट करत आपण केवळ गंमत करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, दोघींमधील हा संवाद आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.