kangana ranaut

अभिनेत्री कंगनाने आज अयोध्येत रामललाचं दर्शन घेतलं. कंगनानं अयोध्येतील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    अभिनेत्री कंगना रणौत(Kangana Ranaut)आज (26 ऑक्टोबर) अयोध्येत (Ayodhya) आली होती. कंगनानं अयोध्येत रामललाचं दर्शन घेतलं आणि पूजादेखील केली. यावेळी तिने अयोध्येत भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाची पाहणी केली. कंगनानं अयोध्येतील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

    कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,“आओ मेरे राम। वाह! मैं श्री हरि विष्णु की कृपापात्र हूँ, उनकी भक्त हूँ और आज मुझपे उनकी इतनी कृपा हुई कि मुझे श्री हरि विष्णु अवतार परम पूजनीय, महान धनुर्धारी, तेजस्वी योधा, तपस्वी राजा, मरियादापुरुषोत्तम श्री राम जन्मभूमि के दर्शन करने को मिले। मेरी फ़िल्म तेजस में रामजन्मभूमि की विशेष भूमिका है, तो ऐसा मन हुआ की राम लल्ला के दर्शन करूँ, धन्य भाग मेरे राम
    मेरे राम मेरे राम …”.

    श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर कंगनानं पत्रकारांसोबत संवाद देखील साधला. यावेळी ती म्हणाली, “अखेर रामललाचं मंदिर आता बांधलं जात आहे. हा हिंदूंचा शतकानुशतके चाललेला संघर्ष आहे आणि आमच्या पिढीला हा दिवस पाहायला मिळत आहे. मी अयोध्येवर एक स्क्रिप्ट देखील लिहिली आहे आणि संशोधनही केले आहे. हा 600 वर्षांचा संघर्ष आहे. हा दिवस आम्हाला पाहायला मिळाला तो मोदी सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे.  जसे व्हॅटिकन ख्रिश्चनांसाठी मोठं तीर्थक्षेत्र आहे तसंच हिंदूंसाठी हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असेल. तेजस चित्रपटात राम मंदिराचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.”

    कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.