
कंगनाने (Kangana Ranaut) आपल्या ट्वीटमध्ये (Tweet) म्हटलं आहे की, ‘इमर्जन्सी सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 ला चित्रपटगृहात लोकांना पाहता येईल.’
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतचं (kangana Ranaut) ट्वीटर अकाऊंट नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बॅन करण्यात आलं होतं. मात्रा आता कंगना ट्वीटरवर पुन्हा परतली आहे. तब्बल 20 महिन्यानंतर ती पुन्हा ट्वीटरवर (Twitter) परत आली आहे. तिने केलेलं हे ट्वीट (Kangana Tweet) सध्या खूप व्हायरल झालं आहे.
And it’s a wrap !!!
Emergency filming completed successfully… see you in cinemas on 20th October 2023 …
20-10-2023 🚩 pic.twitter.com/L1s5m3W99G— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 24, 2023
कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘इमर्जन्सी सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 ला चित्रपटगृहात लोकांना पाहता येईल.’ कंगनाच्या या ट्वीटवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी मिम्स शेअर करत तिला ट्रोलदेखील केलं आहे.
ट्वीटरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 2021 मध्ये तिचं ट्वीटर खातं बंद करण्यात आले होते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा (Elon Musk Twitter Takeover) घेतला आणि चित्र बदललं. कंगना ट्वीटरवर पुन्हा येणार या चर्चांना वेग आला होता. अखेर तिचं ट्वीटर अकाऊंट सुरु झालं आहे. त्यामुळे कंगनाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
बॉलिवूडची पंगा क्वीन कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरादेखील कंगना सांभाळत आहे. भारताच्या 1975 मधील आणीबाणीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. धाकड चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगनाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर आल्यामुळे ही उत्सुकता आणखीनच वाढली. आता तिने शूटींग संपल्याचं जाहीर करत 20 ऑक्टोबर 2023 ला चित्रपट रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांच्या उत्साहाला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कंगनाच्या या चित्रपटातील लूकचीही खूप चर्चा झाली. इंदिरा गांधींप्रमाणे साडी आणि हेअरस्टाईल करण्याचा तिने केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. तो लूक सगळ्यांना आवडला आहे.