kangana saree look

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये स्टार्सनी दिलेल्या परफॉर्मन्स वरुन कंगणानं कुणाचंही नाव न घेता टोमणा मारलेला आहे.

  बॅालिवूडची पंगा क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयापेक्षा कमी पण तिच्या वादग्रस्त विधान करण्यामुळे कायम चर्चेत असते. कधी ती सेलेब्रिटींच कौतुक करताना दिसते तर कधी ती सेलेब्रिटींना नाव ठेवताना दिसते. आता कंगणा तिच्या नव्या विधानामुळे चर्चेत आली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये स्टार्सनी दिलेल्या परफॉर्मन्स वरुन कंगणानं कुणाचंही नाव न घेता टोमणा मारलेला आहे. ‘मी कधीच कुणाच्या लग्नात नाचले नाही’ असं तीनं म्हण्टलंय. इतकंच नाही तर तिनं लता मंगेशकरसोबत यांच्यासोबत स्वत:ची तुलना करताना म्हटलं की, लताजींप्रमाणे तिनही कोणत्याही खासगी कार्यक्रमात परफॉर्म करण्याची ऑफर कधीच स्वीकारली नाही.

  लता मंगेशकर यांचा उल्लेख करत म्हणाली की…

  कंगनानं नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिने एका लेखाचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये लिहिलं होतं – लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, त्यांना कोणी 5 मिलियन डॉलर दिले तरी त्या लग्नात गाणार नाही.

  मला कितीही पैसे मिळाले तरी मी लग्नात कधीच परफॉर्म करत नाही – कंगना

  हे शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘मी माझ्या आयुष्यात खूप आर्थिक संकटाचा सामना केला आहे पण लताजी आणि मी असे दोनच लोक आहोत ज्यांची गाणी सर्वाधिक हिट झाली. मला कितीही पैशाचे आमिष दाखवले गेले तरी मी कधीच लग्नसोहळ्यात नाचले नाही, अनेक सुपरहिट आयटम साँगही मला ऑफर करण्यात आल्या होत्या पण मी डान्स केला नाही. मी अवॉर्ड शोपासूनही दूर राहिले.

  पुढे कंगना म्हणाली की,  प्रसिद्धी आणि पैशाला नाही म्हणायला मजबूत व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा लागते. शॉर्टकटच्या जगात, आजच्या तरुणांना हे समजून घेणे आवश्यक आहे की केवळ तोच पैसा कमावता येतो जो प्रामाणिकपणाचा आहे.