kangana ranawat and nawazuddin siddiqui

कंगना राणौतने नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी (kangana Ranaut Post For Nawazuddin Siddiqui) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीनला जगातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक, असे म्हटले आहे.

    कंगना(Kangana Ranaut) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतीच कंगना राणौतने नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी (kangana Ranaut Post For Nawazuddin Siddiqui) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीनला जगातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक, असे म्हटले आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सिरीयस मेन’(Serious Men) या चित्रपटासाठी नवाजुद्दीनला सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यामुळे कंगनाने खास पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनचे कौतुक केले आहे.

    कंगनाने नवाजुद्दीनचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “अभिनंदन सर, तुम्ही नक्कीच जगातील सर्वात्तम अभिनेत्यांपैकी एक आहात.”

    नवाजने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला नामांकित केल्याबद्दल आभार व्यक्त केले होते. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “वा!!! #seriosumenमुळे मला मानाचा पुरस्कार एमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगरीसाठी नामांकन मिळाले आहे. संपुर्ण टीमचे आभार. दिग्दर्शक सुधीर मिशरा आणि नेटफ्लिक्सचे आभार. तसेच एमीचेही आभार.”

    मिळालेल्या माहितीनुसार, ७१ व्या एमी पुरस्काराचे विजेत्यांची यादी २२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. मागच्या वर्षी ‘दिल्ली क्राइम’या वेब सीरिजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सीरिजचा सन्मान मिळाला होता. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले असूनही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे.