kangana ranavat

सध्या कू ॲपवर कंनगाची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.(Kangana Ranaut Crosses 1 Million Followers On Koo App) कू ॲपवरील ‘नंबर वन’ सेलिब्रिटीमध्ये कंगनाने सर्वोच्च स्थान मिळवले आहे. कूवर कंगनाचे १० लाख म्हणजेच १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

    बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री कंगना रणौतने(Kangana Ranaut) आपल्या उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. कंगना तिच्या सोशल मीडियावरदेखील नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपलं परखड मत व्यक्त करताना दिसते. एका वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनाला मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरवरून सस्पेंड करण्यात आले.मात्र ट्विटरवरून अकाउंट सस्पेंड होताच देसी कंगनाने कू (Koo App) ॲपवर एंट्री घेतली. सध्या कू ॲपवर कंनगाची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.(Kangana Ranaut Crosses 1 Million Followers On Koo App) कू ॲपवरील ‘नंबर वन’ सेलिब्रिटीमध्ये कंगनाने सर्वोच्च स्थान मिळवले आहे. कूवर कंगनाचे १० लाख म्हणजेच १ मिलियन फॉलोअर्स आहेत.

    कंगनाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कू ॲपवर आपले अकाउंट ओपन केले. आत्तापर्यंत या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंगनाचे १० लाखांच्या घरात फॉलोअर्स झाले आहेत. मात्र मागील तीन महिन्यात या फॅन फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कू ॲपवर जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत १० लाखांपर्यंत फॉलोअर्स असणारी कंगना पहिली अभिनेत्री ठरली आहे.

    कंगनाने कू ॲपवरील आपल्या बायोमध्ये लिहिले की, ‘देश भक्त’ आणि सळसळत्या रक्ताची क्षत्रिय महिला. कंगन ने कू ॲपवरूनच आपल्या थलाइवी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले.कूवर एंट्री घेताच कंगनाने पहिले कू केले ज्यात म्हटले की, कू घरी आल्यासारखे वाटते. बाकी सर्व भाड्याचे वाटते. कंगना फेब्रुवारी २०२१ वरून कूवर असून तिचे अकाउंट व्हेरिफाय करण्यात आले आहे.